गतविजेते ऑस्ट्रेलिया यांनी या आवृत्तीच्या आयसीसी महिला टी-२० विश्वचषकात आतापर्यंत दोन पैकी दोन सामने जिंकून त्यांचा जबरदस्त फॉर्म दाखवला आहे. ऑस्ट्रेलिया आता त्यांचा पुढील सामना दुबईत शुक्रवारी पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहेत. ऑस्ट्रेलियाच्या विपरीत, पाकिस्तानचा फॉर्म वर-खाली राहिला आहे. पहिल्या सामन्यात पाकिस्तानने श्रीलंकेचा पराभव केला होता, पण दुसऱ्या सामन्यात भारताकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. पाकिस्तानला उपांत्य फेरीसाठी पात्र होण्यास ऑस्ट्रेलियाविरुद्धचा हा सामना जिंकणे अत्यावश्यक असणार आहे.
आमने-सामने
ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांनी एकमेकांविरुद्ध १५ आंतराष्ट्रीय टी-२० सामने खेळले आहेत, ज्यापैकी ऑस्ट्रेलियाने १३ जिंकले आहेत आणि दोन सामने अनिर्णयीत राहिले आहेत. टी-२० विश्वचषकात त्यांची तीनदा भेट झाली आहे आणि तिन्ही वेळा ऑस्ट्रेलियाने बाजी मारली.
संघ
ऑस्ट्रेलिया: ॲलिसा हिली (कर्णधार), डार्सी ब्राउन, ऍशले गार्डनर, किम गार्थ, ग्रेस हॅरिस, अलाना किंग, फीबी लिचफिल्ड, ताहलिया मॅकग्रा, सोफी मोलिनी, बेथ मूनी, एलिस पेरी, मेगन शुट, ॲनाबेल सदरलँड, टायला व्लामिंक, जॉर्जिया वेअरहॅम
पाकिस्तानः फातिमा सना (कर्णधार), आलिया रियाझ, डायना बेग, गुल फिरोजा, इरम जावेद, मुनीबा अली, नशरा सुंधू, निदा दार, ओमायमा सोहेल, सदफ शमास, सादिया इक्बाल, सिद्रा अमीन, सय्यदा आरूब शाह, तस्मिया रुबाब, तुबा हसन
कुठल्या खेळाडूंवर लक्ष ठेवायचे
बेथ मूनी: ऑस्ट्रेलियाचा ही डावखुरी सलामीवीर या विश्वचषकात शानदार फलंदाजी करत आहे. तिने श्रीलंका आणि न्यूझीलंडविरुद्ध अनुक्रमे नाबाद ४३ आणि ४० धावा केल्या आहेत. तिने बॅटसह ऑस्ट्रेलियाला चांगली सुरुवात करून दिली आहे.
मेगन शुट: न्यूझीलंडविरुद्धच्या तिच्या मागील सामन्यात तीन विकेट्स घेतल्यानंतर, ऑस्ट्रेलियाची ही उजव्या हाताची वेगवान गोलंदाज आता आयसीसी महिला टी-२० विश्वचषकातील सर्वाधिक विकेट्स घेणारी गोलंदाज झाली आहे. विकेट्स घेण्याबरोबरच ती किफायतशीर गोलंदाजी करते.
फातिमा सना: पाकिस्तानची कर्णधार आतापर्यंत या विश्वचषकात बॅट आणि चेंडूने तिच्या संघासाठी उपयुक्त योगदान देत आहे. तिने दोन सामन्यांत ४३ धावा केल्या आहेत आणि चार विकेट्स घेतल्या आहेत.
निदा दार: पाकिस्तानच्या या अनुभवी अष्टपैलू खेळाडूकडून, फलंदाजी आणि गोलंदाजी, या दोन्ही विभागात चांगली कामगिरी अपेक्षित आहे. भारताविरुद्धच्या तिच्या मागील सामन्यात तिने ३४ चेंडूत २८ धावा केल्या होत्या. तथापि, चेंडूसह, तिला या विश्वचषकात अद्याप प्रभाव पाडता आलेला नाही कारण तिला अजून एकही विकेट पटकावता आलेली नाही.
हवामान
सुमारे ३१ अंश सेल्सिअस तापमानासह हवामान उबदार राहण्याचा अंदाज आहे. आर्द्रता जवळपास ५३% असेल.
सामन्याची थोडक्यात माहिती
तारीख: ११ ऑक्टोबर २०२४
वेळ: संध्याकाळी ७:३० वाजता
स्थळ: दुबई आंतराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम
प्रसारण: स्टार स्पोर्ट्स नेटवर्क, डिस्नी + हॉटस्टार