लाच घेताना सहाय्यक दुय्यम निबंधक जाळ्यात

ठाणे : घराचे रजिस्ट्रेशन करून देण्यासाठी 12 हजारांची लाच स्वीकारणाऱ्या कल्याण पूर्वेकडील सहाय्यक दुय्यम निबंधकाला ठाणे अँटी करप्शन ब्युरोच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. राज कोळी असे या अधिकाऱ्याचे नाव असून तक्रारदाराकडे त्याने 24 हजारांची मागणी केली होती.

लाचखोर दुय्यम निबंधकाने तक्रारदाराकडे 24 हजारांची मागणी केल्यानंतर तडजोडअंती ही रक्कम बारा हजार रुपये ठरली. बुधवारी सकाळच्या सुमारास कल्याण पूर्वेकडील सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयात राज कोळी याला बारा हजार रुपये स्वीकारताना अँटी करप्शन ब्युरोने सापळा रचत अटक केली. राज कोळी यांच्यासोबत एका खाजगी इसमाला देखील ठाणे अँटी करप्शन ब्युरोने ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला.