डॉ. मालतीबाई चिटणीस यांच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून ‘ठाणेवैभव’ने त्यांचा सुवर्ण प्रवास एका कॉफी टेबल बुकच्या माध्यमातून उलगडला. तिन्ही पिढ्या डॉ. मालती बाई, डॉ. किशोर-डॉ. मेघना, डॉ. निखिल-डॉ. मिनल चिटणीस यांच्या कार्याचा लेखाजोखा या कॉफी टेबलबुकमध्ये पाहायला मिळतो. या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन ठाण्यातील सुप्रसिध्द डॉक्टर विजय बेडेकर, डॉ. राजीव वैशंपायन, डॉ. अजित प्रधान, डॉ. पुरोहित, डॉ. वागळे आणि ‘ठाणेवैभव’चे संपादक मिलिंद बल्लाळ यांच्या हस्ते शनिवारी पार पडले. यावेळी ‘ठाणेवैभव’चे व्यवस्थापकीय संपादक निखिल बल्लाळ हे देखील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निकिता भागवत यांनी केले.