ठाणे: विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नुकतीच ठामपाचे माजी विरोधी पक्षनेते शानू पठाण यांच्या निवासस्थानी भेट दिली. या भेटीदरम्यान दोघांमध्ये सुमारे दोन तास चर्चा झाली. इंडिया आघाडीचे प्रवक्ते तथा आमदार डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्ह्यात आम्ही महाविकास आघाडीला बळ देऊ, असा विश्वास श्री.पठाण यांनी दानवे यांना दिला.
विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे हे नुकतेच ठाणे दौऱ्यावर आले होते. त्यावेळी दानवे यांनी शानू पठाण यांना त्यांच्या निवासस्थानी भेट दिली. या प्रसंगी शानू पठाण, मर्झिया पठाण यांना सामाजिक तथा राजकीय विषयांवर त्यांनी मार्गदर्शन केले. मर्झिया पठाण यांच्या सामाजिक आणि राजकीय कार्याचे श्री.दानवे यांनी कौतुक केले.
ठाणे जिल्ह्यात महाविकास आघाडीला लोकप्रियता लाभत आहे. ठाणे जिल्ह्यात डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व कार्यकर्ते महाविकास आघाडीला प्रचंड यश संपादन करून देऊ, असे शानू पठाण यांनी दानवे यांना सांगितले.