अंबरनाथ तालुक्यातील सर्व पर्यटनस्थळे होणार सुरू

ठाणे: ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यातील पर्यटन क्षेत्रांवर बंदी आदेश मागे घेण्यात आले आहेत. अंबरनाथ तालुक्यातील सर्व पर्यटन स्थळे सुरू होणार आहेत. पावसाळी पर्यटन स्थळांवरील बंदी हटवण्यात आली आहे. भाजप आमदार किसन कथोरे यांच्या मागणीला यश आले आहे.

अंबरनाथ तालुक्यातील सर्व पर्यटन स्थळांवर 30 ऑगस्टपर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आले होते. मात्र, भाजप आमदार किसन कथोरे यांनी पर्यटन स्थळांवरील बंदी हटवण्याची मागणी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. आज ही मागणी पूर्ण होऊन सर्व पर्यटन स्थळांवरील बंदी हटवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

अंबरनाथ तालुक्यात कोंडेश्वर, बारवी नदी, चिखलोली, मलंगगड परिसर अशी अनेक पर्यटन क्षेत्र आहेत. विशेषतः पावसाळ्यात मुंबई, ठाणे आणि जवळपासच्या भागातून याठिकाणी मोठ्या संख्येनं पर्यटक पावसाळी सहलीसाठी येत असतात. मात्र येथे आल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने तसेच मद्यपान करून पाण्यात उतरणं आणि अशा अनेक गोष्टींमुळे दरवर्षी अनेक पर्यटकांचा मृत्यू होतो, तर अनेक अपघातही घडतात. यामुळे पावसाळी पर्यटन स्थळांवरील बंदी घालण्यात आली होती.

मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या अंबरनाथ तालुक्यात कोंडेश्वर, भोज धरण, बारवी नदी, चिखलोली अशी जवळपास दहा ते बारा पर्यटन क्षेत्र आहेत. विशेषतः पावसाळ्यात मुंबई, ठाणे आणि जवळपासच्या भागातून याठिकाणी मोठ्या संख्येनं पर्यटक पावसाळी सहलीसाठी येत असतात. पावसाळी पर्यटनामुळे वाढत असलेल्या जीवितहानीमुळे पर्यटन स्थळांवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आता ही बंदी हटवण्यात आली आहे.