परिवहन समिती सदस्य शमीम खान यांचा पाठपुरावा
ठाणे : मुंब्रा, कौसा आणि शीळफाटा येथील नागरिकांना अंतर्गत प्रवासासाठी आणि नोकरी धंद्यानिमित्त मीरा रोड येथे जाण्यासाठी दोन वातानुकुलित बस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
भारत गिअर्स कंपनी ते मीरारोडसाठी बस क्रमांक ७५ आणि रेती बंदरपासून स्वातंत्र्यसैनिक मौलाना हकीम अजमल खान रूग्णालय या मार्गावर बस क्रमांक ७६ उपलब्ध करून देण्यात आली आहे. या दोन बसमुळे विद्यार्थी, रुग्ण, शिक्षकवर्ग आणि कामगार, कर्मचारी यांचा प्रवास सुखदायी होणार आहे.
राष्ट्रवादीचे नेते, आमदार डॉ जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे परिवहन समितीचे सदस्य शमीम खान यांनी याबाबत पाठपुरावा केला. त्यांच्या वाढदिवशी ७ जानेवारीला या दोन बसचे उद्घाटन करण्यात आले. या पूर्वीही शमीम खान यांनी या भागासाठी बस उपलब्ध करून दिल्या होत्या.