सुमारे ४० हजार नागरिकांकडून कपिल पाटील यांचे अभिष्टचिंतन

भिवंडी : केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांचे वाढदिवसानिमित्ताने सुमारे ३५ ते ४० हजारांहून अधिक नागरिकांनी दिवसभरात अभिष्टचिंतन केले. त्यांच्या वाढदिवसानिमित्त दिवेअंजुर येथे स्नेहीजनांचा मेळावा भरला होता. तर भिवंडी लोकसभा मतदारसंघातील विविध भागात सामाजिक बांधिलकी जपणारे कार्यक्रम करण्यात आले. या वाढदिवसानिमित्ताने संपूर्ण मतदारसंघात चैतन्ममय वातावरण निर्माण झाले होते.

केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांचा मंगळवारी वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. भिवंडी तालुक्यातील दिवेअंजुर येथील त्यांच्या निवासस्थानी स्नेहीजनांचा मेळा भरला होता. सकाळी ९ पासून रात्री १२ पर्यंत सुमारे ३५ ते ४० हजार नागरिकांनी कपिल पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच सन्मान केला. काही नागरिकांनी पगडी, उपरणे, वीणा, चिपळ्या आणि तुळशीचा हार घालून केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचा गौरव केला.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनकड, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध केंद्रीय मंत्री, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विविध मंत्री, देशभरातील खासदार, आमदारांनी कपिल पाटील यांनी पत्र वा दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या.

भिवंडी लोकसभा मतदारसंघात वाढदिवसानिमित्ताने विविध सामाजिक उपक्रम आयोजित केले होते. बदलापूर येथे माजी खासदार जगन्नाथ पाटील यांच्या हस्ते १०० हून अधिक महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. वाडा तालुक्यातील गारगाव व चिंचघर येथे महिलांना सक्षमीकरणाबाबत मार्गदर्शन करून भेटवस्तू देण्यात आली. शहापूर व मुरबाड तालुक्याबरोबरच भिवंडी व कल्याण शहरात कार्यक्रम पार पडले.

भिवंडी तालुक्यातील अंजुर येथे केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक २०२४ भरविण्यात आला होता. या स्पर्धेलाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शहापूर तालुक्यातही शहापूर, कसारा, दहीवलीसह काही गावांमध्ये महिला सक्षमीकरणाच्या कार्यक्रमांबरोबरच जिल्हा परिषदेच्या शाळा व अंगणवाड्यांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.