ठाणे: डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या सुचनेनुसार तथा जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या शिफारशीवरून राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या ठाणे महानगरपालिकेतील गटनेतेपदी नगरसेवक अभिजीत पवार यांची निवड करण्यात आली आहे.
ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर अश्रफ शानू पठाण यांची ठाणे महानगरपालिकेत गटनेतेपदी निवड करण्यात आली होती. मात्र, नुकत्याच झालेल्या महासभेत शानू पठाण यांची विरोधी पक्ष नेतेपदी निवड केल्याने रिक्त झालेल्या गटनेतेपदावर अभिजीत पवार यांची निवड करण्यात आली आहे. अभिजीत पवार हे प्रभाग क्रमांक 9 मधून विजयी झाले असून राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे तथा डाॅ.जितेंद्र आव्हाड यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे.