आधारवाडी डम्पिंगला आग

कल्याण :  कल्याण पश्चिमेकडील  आधारवाडी डम्पिंग ग्राउंडला मंगळवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास आग लागली. आगीने काही क्षणात रौद्र रूप धारण केले.

आगीनंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर धूर पसरला होता. आगीची माहिती मिळताच अग्निशमन विभागाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन विभागाच्या सहा गाड्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत होत्या, वर्षभरापासून डम्पिंगवर जाणारा कचरा बंद करण्यात आला असला तरी डम्पिंगवर सुका कचरा मोठ्या प्रमाणावर आहे, यामुळे या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना पाण्याचा मारा करावा लागला. तब्बल तीन तासाच्या प्रयत्नांतर आग नियंत्रणात आणण्यात अग्निशमन विभागाला यश आले.