नववर्षाच्या पूर्वसंध्येला विशेष लोकल सोडणार

मुंबई : सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईत उशिरापर्यंत थांबण्याचं नियोजन करणाऱ्यांसाठी दिलासा देणारा निर्णय मध्य रेल्वेनं घेतला आहे. नववर्षाच्या पूर्वसंध्येला मध्य रेल्वेवकडून मेन लाइन आणि हार्बर मार्गावर विशेष फेऱ्या चालवल्या जाणार आहेत. मध्य रेल्वे नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला ४ विशेष उपनगरीय सेवा चालवणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून विशेष ट्रेन ३१ डिसेंबर २०२३ आणि १ जानेवारी २०२४ च्या मध्यरात्री १.३० वाजता सुटेल आणि कल्याण येथे ३ वाजता पोहोचेल.

कल्याण येथून विशेष ट्रेन ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी २०२४ च्या मध्यरात्री १.३० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ३ वाजता पोहोचेल.

विशेष ट्रेन ३१ डिसेंबर २०२३ आणि १ जानेवारी २०२४ च्या मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून १.३० वाजता सुटेल आणि २.५० वाजता पनवेल येथे पोहोचेल.

पनवेल येथून विशेष ट्रेन ३१ डिसेंबर २०२२ आणि १ जानेवारी २०२३ च्या मध्यरात्री १.३० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे २.५० वाजता पोहोचेल. या सर्व विशेष उपनगरी ट्रेन सर्व स्थानकांवर थांबतील.