साईनाथ मंदिरात भक्तांच्या सहभागातून सोन्याचे सिंहासन

वर्धापनदिन सोहळा उत्साहात

ठाणे: श्री साईनाथ सेवा समितीच्या वतीने साईबाबा मंदिराचा वर्धापन दिन सोहळा 5 ते 7 डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. आज पहिल्या पहाटे 6 वाजता आमदार संजय केळकर यांनी सपत्नीक साईबाबांच्या मूर्तीची यथासांग महापूजा केली.

साईबाबांना दूध, दही, अत्तराने स्नान घालून भरजरी वस्त्र शाल परिधान करण्यात आले. त्यानंतर सोन्याचे सिंहासन आणि सोन्याच्या गाभाऱ्याचे भक्तार्पण सर्व साईभक्तांच्या उपस्थितीत आमदार संजय केळकर यांच्या हस्ते मंत्रउच्चारात करण्यात आले. यावेळी त्यांच्या सोबत केळकर यांच्या मातोश्री आणि पत्नीही उपस्थित होत्या.

यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बळीराम नईबागकर, कार्याध्यक्ष मंगेश नईबागकर, हरी माळी, समितीचे उपाध्यक्ष अशोक सुर्वे आणि अशोक हिरानंदानी, खजिनदार बबन बोबडे, सचिव सुरेश महाडिक, उपसचिव विकास झगडे, अपर्णा जाधव, प्रवीण रोठे, विश्वस्त नंदकुमार साळवी, व संस्थेचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते, भक्तगण मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. उत्सवादरम्यान आज विष्णुयाग यज्ञ, लाडू प्रसाद वाटप करण्यात आले.