रितेश देशमुख ठरले ब्रँड ॲम्बेसेडर
ठाणे : ‘पितांबरी’ने नैसर्गिक सुगंधांपासून निर्मित देवभक्ती अगरबत्ती बाजारात आणली असून, या उत्पादनासाठी बॉलिवूड अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता रितेश देशमुख यांची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे. यानिमित्त कंपनीने एक नवीन देशव्यापी जाहिरात देखील लोकांसमोर आणली आहे.
नैसर्गिक घटकांपासून तयार करण्यात आलेली आणि अस्सल फुलांच्या सुगंधाने समृद्ध पितांबरी देवभक्ती अगरबत्ती दैनंदिन पूजा अधिक पवित्र, सुगंधित आणि आनंददायी करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आली आहे. चंदन, मोगरा, गुलाब, चंपा यांसह विविध सुगंधांमध्ये उपलब्ध असलेली ही अगरबत्ती ग्राहकांना पवित्र आणि प्रसन्न अनुभव प्रदान करते.
जाहिरातीचा शेवट जिथे श्रद्धा आणि भक्ती, तिथे दरवळे पितांबरी देवभक्ती या टॅगलाईनने होतो. या जाहिरातीची संकल्पना आणि दिग्दर्शन महेश लिमये यांच्या ली प्रॉडक्शन्सने केले आहे. याविषयी बोलताना पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा. लि. चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. रविंद्र प्रभुदेसाई म्हणाले, पितांबरी देवभक्ती अगरबत्तीच्या माध्यमातून नैसर्गिक घटक आणि अस्सल फुलांच्या सुगंधाची सांगड घालत पूजा-अर्चनेचा अनुभव अधिक पवित्र आणि समाधानकारक करण्याचा आमचा प्रयत्न आहे. कंपनीचे व्हाईस चेअरमन परीक्षित प्रभुदेसाई म्हणाले, पितांबरी देवभक्ती अगरबत्ती ही नैसर्गिक सुगंधांनी युक्त भारतातील पहिली मास-प्रोडयुस्ड अगरबत्ती आहे. माझा विश्वास आहे की, या उत्पादनाला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळेल आणि देशभरात याची वेगळी ओळख निर्माण होईल.