दिल्लीतील आंदोलनाला ठाकरे गटाचा पाठिंबा

ठाण्यात शिवसेनेची निषेध रॅली

ठाणे: दिल्लीतील जंतरमंतरवरील विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमारच्या विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आज ठाण्यात जोरदार निषेध रॅली काढली. या रॅलीत ठाण्यातील विविध शाळा आणि महाविद्यालयातील हजारो विद्यार्थी, पालक यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

निषेध रॅलीची सुरुवात चिंतामणी चौकपासून करण्यात आली. त्यानंतर पुढे मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ रॅलीची सांगता करण्यात आली. आंदोलनकर्त्यांनी हातात तिरंगा, निषेधाचे फलक घेत केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या हा एकच आवाज यावेळी घुमला.

यावेळी या रॅलीमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, माजी खासदार राजन विचारे, जिल्हाप्रमुख केदार दिघे, महिला जिल्हा संघटिका रेखा खोपकर, शहरप्रमुख अनिश गाढवे, ठाणे महानगर संघटक महेश कदम, ओवळा-माजिवडा संपर्कप्रमुख नरेश मणेरा, उपजिल्हाप्रमुख प्रदीप शिंदे, सुनील पाटील, ठामपा नगरसेवक शहाजी खुस्पे, माजी नगरसेवक नंदिनी विचारे, मंदार विचारे, संजय तरे, महेश्वरी तरे तसेच आकांक्षा राणे, प्रमिला भांगे, नंदा कोथळे, वसंत गवाळे, सचिन चव्हाण, सर्व विभागप्रमुख, उपविभाग प्रमुख, उप शहर प्रमुख व सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक तसेच सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.