चांदीच्या विटा नेणारी व्हॅन पलटी

चारोटी उड्डाणपुलावरील घटना

पालघर: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चारोटी उड्डाणपुलावर चांदी वाहून नेणारी व्हॅन पलटी झाल्याची घटना घडली आहे. मुंबईहून गुजरातच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला.

या व्हॅनमध्ये तब्बल 600 किलो चांदीच्या विटा असून त्यांची किंमत अंदाजे 17 कोटी 66 लाख इतकी असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतील नाकोडा बुलियन कंपनीकडून वापी जीआयडीसी येथील मोदी सन्स लिमिटेडकडे ही चांदी घेऊन जात असताना अपघात घडला.

अपघातात वाहन चालक किरकोळ जखमी झाला असून कासा पोलीसचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. या प्रकरणी आता पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.