शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पुढाकार
ठाणे:’सावरकर नगर व विभागातील इतर परिसरात दडपशाहीने व कोणतीही पूर्वसूचना न देता स्मार्ट मिटर लावण्याचे प्रकार उघडकीस आले असून त्याविरोधात रहिवाशांकडून एम.एस.ई.बी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
हे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शाखाप्रमुख पंकज भालेराव यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. यावेळी विभागातील शिवसेना पक्षाचे पदाधिकारी, महिला आघाडी व स्थानिक रहिवासी उपस्थित होते. यापुढे रहिवाशांना सूचना देऊनच मिटर बदलावा व तशी कल्पना विभागातील रहिवाशांना आधी द्यावी, त्यांच्या शंकेचे निराकरण झाल्यावरच मिटर बदलावा, अशी मागणी करण्यात आली.