कल्याण : क्रेडाई महाराष्ट्र चेंबर ऑफ हौसिंग इंडस्ट्री कल्याण डोंबिवली युनिट गेली १४ वर्षे लोकांच्या घरांचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करित आहे. त्यासाठी १६ एप्रिल ते १९ एप्रिल पर्यंत १५वे प्रॉपर्टी प्रदर्शन कल्याण पश्चिमेतील फडके मैदानात आयोजित करण्यात आले आहे.
प्रत्येक घर खरेदीदाराला आपल्या पसंतीचे घर आपल्याला हव असलेल्या ठिकाणी घेण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी एमसीएचआय कल्याण डोंबिवलीचे अध्यक्ष विकास जैन, सचिव साकेत तिवारी, प्रदर्शनाचे अध्यक्ष दिनेश मेहता, माजी अध्यक्ष रवी पाटील आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
या प्रदर्शनात कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा, शहापूर ते ठाणा, शिळफाटा रोड परिसरातील सर्व सुविधायुक्त घरे बघण्याची संधी कल्याण डोंबिवलीकरांना मिळणार आहे. फक्त १६ लाखापासून सुरू होणारी आणि १ करोडपर्यंत घरे प्रदर्शनात उपलब्ध असणार आहे. बजेटध्ये बसतील आणि सर्वांना परवडतील अशी मनाजोगी घरे देण्याचा प्रयत्न क्रेडाई एम.सी.एच.आय. कल्याण डोंबिवली युनिटच्या माध्यमातुन करण्याचा प्रयत्न आहे. ४० हून अधिक विकासक १५० हुन अधिक प्रोजेक्ट एका छताखाली बघता येणार आहे. गेल्या अनेक वर्षाचा अंदाज बघता २५ हजाराहून अधिक नागरिक भेट देतील असा अंदाज आहे.
यावर्षी स्पॉट बुकिंग डिस्काऊंट तर आहेच तसेच प्रत्येक तासाला एक लकी ड्रो देखील काढले जाणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार विश्वनाथ भोईर, केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल, महापौर हर्षाली चौधरी तसेच अन्य मान्यवर प्रदर्शनाला भेट देणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.