वाघबीळ परिसरात महानगर गॅसवाहिनीचे भूमिपूजन

ठाणे: सुरक्षा पर्न, आयवी, विजय ओरेविया वाघबीळ रोड, ठाणे येथे महानगर गॅस पाइपलाईन कामाचा भूमिपूजन सोहळा आमदार संजय केळकर यांच्या हस्ते झाला. यावेळी नगरसेवक विकास पाटील व नागरिक उपस्थित होते.
या कामामुळे परिसरातील नागरिकांना सुरक्षित, सोयीस्कर आणि सातत्यपूर्ण गॅस सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. स्थानिक रहिवाशांची दीर्घकालीन गरज लक्षात घेऊन हे पाऊल उचलले आहे. उपस्थित नागरिकांशी संवाद साधत कामाच्या नियोजनाबाबत चर्चा केली. काम वेळेत आणि व्यवस्थित पूर्ण होईल, यासाठी प्रशासनाशी सतत पाठपुरावा सुरू आहे, असे आ. केळकर यांनी बोलताना सांगितले.