मतदारांनी राखली ठाकरे गटाची प्रतिष्ठा
कल्याण: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ठोस पाठिंब्याशिवाय कल्याणमध्ये पक्षाचे 11 नगरसेवक विजयी झाले असून कल्याण पश्चिम, पूर्व व आंबिवली पूर्व भागातील चाळकरी चाकरमानी मराठी मतदारांनी तब्बल ११ नगरसेक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक निवडून देत शिवसेना उबाठा पक्षाची प्रतिष्ठा राखली आहे.
शिवसेना उद्धव ठाकरे गटाने मनसेशी युती करून जागा वाटपाची बोलणी केली. उद्धवसेनेने ६५ जागा तर मनसेने ५४ जागा घेतल्या मात्र प्रत्यक्षात उद्धवसेनेला केवळ ५४ ठिकाणी उमेदवार देता आले. कल्याण पश्चिमेकडील पॅनल क्रमांक सहा मध्ये शिंदेसेनेच्या उमेदवार आणि माजी महापौर वैजयंती घोलप यांचा पराभव उद्धवसेनेच्या अर्पणा भोईर यांनी केला. तर मनसेतून शिंदेसेनेत आलेल्या कस्तुरी देसाई यांचा पराभव उद्धवसेनेच्या स्वप्नाली केणे यांनी केला. तर उमेश बोरगावकर आणि संकेश भोईर यांनी शिवसेनेत दिग्गज असलेल्या माजी नगरसेवक संजय पाटील आणि त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका निलिमा पाटील यांचा पराभव केला. पॅनल क्रमांक १० ब मधून उद्धवसेनेचे विशाल गारवे यांनी शिंदेसेनेचे माजी नगरसेवक विद्याधर भोईर यांचा पराभव केला.
आंबिवलीमधील पॅनल क्रमांक ४ अ मधून उद्धव सेनेचे तेजस्विनी गायकवाड यांनी शिंदे सेनेच्या पूजा जोगदंड यांचा तर ४ ब मधून उद्धव सेनेचे राहुल कोट यांनी शिंदे सेनेच्या मयूर पाटील यांचा पराभव केला. कल्याण पूर्वेतील पॅनल पॅनल १३ अ मधून उद्धव सेनेचे किर्ती ढोणे यांनी शिंदे सेनेच्या महादेव रायभोळे यांचा तर पराभव केला तर १३ ड मधून उद्धव सेनेचे मधुर म्हात्रे यांनी भाजपाचे उपमहापौर विक्रम तरे यांचा पराभव केला.१५ अ मधून उद्धव सेनेचे ॲड .वंदना महाले यांनी शिंदे सेनेच्या ज्योसना हुमणे यांचा पराभव केला. पॅनल १६ अ मधून उद्धव सेनेचे निलेश खंबायत यांनी शिंदे सेनेच्या श्वेता जाधव यांचा पराभव केला तर पॅनल १६ अ मधून उद्धव सेनेचे निलेश खंबायत यांनी शिंदे सेनेच्या श्वेता जाधव यांचा पराभव केला.
उद्धवसेना आणि शिंदेसेना यांच्यात २२ ठिकाणी थेट सामना झाला. २२ जागांवर शिंदेसेनेच्या उमेदवारांच्या विरोधात उद्धवसेनेच्या उमेदवारांनी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली. तर भाजपच्या विरोधात १२ ठिकाणी उद्धवसेनेने चांगली लढत देत दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. उद्धवसेनेकडून उमेदवारांसाठी रसद पुरविली गेली नाही. बड्या नेत्यांच्या प्रचारसभा झाल्या नाहीत. निवडणुकीचे नियोजन नव्हते. उमेदवारी वाटपात घोळ होता. काही प्रभागात दोन उमेदवारांना एबी फॉर्म दिले गेले. तरीही उद्धवसेनेने ११ जागांवर विजय मिळविला.