शिवसेना जिल्हा प्रमुखांच्या स्नुषेचे ठाणे पूर्वेत बंड

ठाणे: ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा (शिंदे गट) बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोपरी ठाणे (पूर्व) येथे खुद्द शिवसेनेचे कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांच्या स्नुषेने बंड केल्याने खळबळ उडाली आहे.

कोपरी ठाणे (पूर्व) प्रभाग क्र. २० मधून शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्या स्नुषा आणि युवासेना कार्यकारणी सदस्य व युवासेना महाराष्ट्र राज्य समन्वयक स्वप्निल लांडगे यांच्या पत्नी ॲड. वैशाली लांडगे या इच्छुक होत्या. त्यांनी उमेदवारी अर्जही दाखल केला होता परंतु शेवटच्या क्षणी त्यांना उमेदवारी नाकारल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली. या प्रभागातील नागरिक आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव त्यांनी प्रभाग क्र. २० ब मधुन अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे