कसारा: शिवसेना कसारा शाखेच्या वतीने महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या एक दिवसीय सहलीत २०० हून अधिक महिलांना महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले शक्तिपीठ श्री क्षेत्र मराडेपाडा येथे दर्शन घडविण्यात आले.
आगामी काळात एकूण १००० महिलांना शिवाजी महाराज मंदिराचे दर्शन घडविण्याचा मोठा मानस कसारा शाखेच्या वतीने ठेवण्यात आला असल्याची माहिती मुख्य संयोजक शहापुर तालुका संपर्क प्रमुख संतोष लहाने यांनी दिली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे, शौर्याचे आणि संस्कारमूल्यांचे दर्शन महिलांना प्रत्यक्ष स्थळी घडावे, हा या सहलीचा प्रमुख हेतू आहे. या सहलीच्या यशस्वी आयोजनासाठी संतोष लहाने यांच्यासह उपतालुका प्रमुख बंधू सोडणर, कृषि उत्पन्न बाजार समिती, शहापूरचे उपसभापती शरद वेखंडे, युवा उद्योजक संदीप शिंदे, कसारा शहर प्रमुख शिवाजी भोसले, पोपट लहाने, गोविंद तळपडे, महेश गिळंदे, सुरेश पांडे यांचे विशेष सहकार्य लाभले. महिला आघाडीच्या पदाधिकारी माधुरी अहिरे (महिला विभागीय अध्यक्ष) लता जाधव-खानझोड़े (महिला आघाडी प्रमुख कसारा शहर), ज्योती भोसले आदी कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त उपस्थिती दर्शविली.