कल्याण : टिटवाळा येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माजी नगरसेविका अपेक्षा जाधव यांनी रविवारी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्यासोबत मनसेचे मांडा-टिटवाळा उपविभागाध्यक्ष बंदेश जाधव यांनीही पक्षप्रवेश करत स्थानिक राजकारणात नवे समीकरण निर्माण केले. कल्याण शहर प्रमुख रवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या कार्यक्रमात हा जाहीर प्रवेश झाला.
२०१५ च्या केडीएमसी निवडणुकीत प्रभाग ८ मधून मनसेच्या तिकीटावर विजयी झालेल्या अपेक्षा जाधव यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करूनही सत्ता नसल्याने व निधीअभावी अपेक्षित विकासकामे करता आली नसल्याचे सांगितले. अखेर सत्ताधारी शिवसेनेत येण्याचा निर्णय घेत तसेच एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून आपण त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या माध्यामातून जनतेच्या विकासाठी सदैव कार्यतत्पर राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.