कुळगाव-बदलापूरमध्ये एक लाख ३०,९२६ मतदारांनी केले मतदान

ठाणे: ठाणे जिल्ह्यातील कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 2 डिसेंबर रोजी झालेल्या मतदानाच्या प्राप्त अंतिम आकडेवारीनुसार एकूण 58.10 टक्के मतदान झाले असल्याची माहिती कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली.

मतदार यादीनुसार कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेमध्ये एकूण 24 प्रभागांमध्ये मतदान झाले. या 24 प्रभागांमध्ये एकूण एक लाख 17,653 पुरुष, एक लाख 7686 स्त्री आणि 16 इतर असे एकूण दोन लाख 25,355 मतदार होते. त्यापैकी 68,257 पुरुष, 62,667 स्त्री आणि दोन इतर असे एकूण एक लाख 30,926 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. मतमोजणी रविवार 21 डिसेंबर 2025 रोजी होणार आहे.