नवी मुंबईत थकबाकीदारांवर टाच

मालमत्ता कर विभाग ॲक्शन मोडवर

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेचा मालमत्ता कर विभाग ॲक्शन मोडवर आला असून थकबाकीदादारांना जप्तीपूर्व नोटीस बजावण्यात आल्या आहेत. नवी मुंबई महानगरपालिका मालमत्ताकर विभागाकडून थकबाकीदारांविरुद्ध जप्तीपूर्व नोटीस बजावण्यास सुरुवात झाली आहे.

एकूण थकबाकीदारांपैकी आतापर्यंत ६४५ नागरिकांना सात दिवसांची जप्तीपूर्व नोटीस बजावण्यात आली आहे. तर २१८ नागरिकांना ४८ तासांची जप्तीपूर्व नोटीस बजावण्यात आली आहे. थकबाकीदारांनी तातडीने कर न भरल्यास पुढील टप्प्यात महानगरपालिकेकडून प्रत्यक्ष जप्ती कारवाईला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती मालमत्ता विभागाने दिली.

नवी मुंबई महापालिकेच्या मालमत्ता विभागामर्फत आतापर्यंत ५४८.७१ कोटी मालमत्ता कर जमा झाला असून मालमत्ताधारकांनी लवकरात लवकर कर भरावा. अन्यथा जप्ती व अटकावणीच्या कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा मालमत्ता कर विभागाचे उपायुक्त अमोल पालवे यांनी दिला आहे.