जैसलमेर: राजस्थानातील जैसलमेर येथे आज (१४ ऑक्टोबर) प्रवाशांनी भरलेल्या बसला आग लागली आहे. या अपघातात १० जणांचा मृत्यू झाला आहे. ही बस जैसलमेरहून जोधपूरला जात होती. त्याचवेळी बसला आग लागल्याची घटना घडली. या बसमध्ये एकूण ५० हून अधिक प्रवासी प्रवास करत होते. या बसमधले १४ प्रवासी गंभीर भाजले आहेत
बसच्या समोरच्या सीटवर बसलेल्या प्रवाशांना बाहेर पडण्यात यश आलं आहे. पण मागच्या सीटवर बसलेले लोक भाजले आहेत. या जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बसमधील १४ प्रवासी गंभीररित्या भाजले गेले आहेत आणि त्यापैकी १० प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं वृत्त ऑल इंडिया रेडिओने दिलं आहे.
बस जैसलमेरवरुन जोधपूरला येथे जात होती. जेव्हा ही बस वॉर म्युझियमच्याजवळ पोहचली, असताना अचानक बसमधून धूर येऊ लागला आणि काही क्षणात बस जळून खाक झाली. त्यामुळे कोणाला वाचवण्याची संधी मिळाली नाही. आग लागली तेव्हा बसमध्ये ५० प्रवासी बसले होते. आग लागल्यानंतर काही प्रवासी खिडक्या आणि दरवाज्यातून बाहेर आले. परंतु काही प्रवासी अडकले आणि आगीच्या तावडीत सापडले. रस्त्यावरील लोकांनी या अपघाताची तक्रार पोलीस आणि अग्निशमन दलाला दिली. त्यानंतर मदत आणि बचावकार्य सुरु झाले.