शहापूर पंचायत समिती गण आरक्षण जाहीर

शहापूर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहापूर पंचायत समिती गण आरक्षण जाहीर करण्यात आले. ३० जागांपैकी अनुसूचित जमाती १५, अनुसूचित जाती दोन तर नागरिकांचा मागास प्रवर्ग जागा १३ अशा विविध प्रवर्गासाठी आरक्षित झाल्या आहेत.

अनुसूचित जमाती १५ यामध्ये ८ जागांवर महिला तर सात जागांवर पुरुष, अनुसूचित जाती दोन यामधून एक महिला व एक सर्वसाधारण पुरुष तर नागरिकांचा मागास प्रवर्ग १३ जागांमधून सहा महिलांसाठी, सर्वसाधारणसाठी सात जागांचे आरक्षण जाहीर करण्यात आले. यामुळे शहापूर पंचायत समितीच्या एकूण गणांपैकी बहुतांश जागा महिला उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. यंदाच्या निवडणुकीत महिलांचे मोठे प्रतिनिधित्व दिसून येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

स्थानिक राजकीय समीकरणांमध्ये या आरक्षणाचा मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता प्रत्येक पक्ष आणि संभाव्य उमेदवार या नव्या आरक्षणानुसार आपली रणनिती आखतील. यावेळी विविध पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

असे आहे आरक्षण

अनुसूचित जमाती १५ पैकी आठ महिला आणि सात सर्वसाधारण, महिला आरक्षित गण: बिरवाडी, डोळखांब, कसारा बुद्रुक, सावरोली, टेंभा, शिरोळ, अघई, कसारा खुर्द, सर्वसाधारण गटात सावरोली बुद्रुक, कोठारे, वेहळोली, खर्डी, चोंढे, चेरपोली, नडगाव (जा), अनुसूचित जाती दोन मध्ये वासिंद पूर्व महिला, वासिंद पश्चिम पुरुष /सर्वसाधारण, नागरिकांचा मागास प्रवर्ग १३ पैकी १२, महिलांसाठी शेणवे, गोठेघर, किन्हवली, शेरे, वेहलोली, अस्नोली, सर्वसाधारणमध्ये खातिवली, कळंबे, चिखलगाव, सापगाव, आल्याणी, सरळांबे, आसनगाव.