एपीएमसी वाशी येथे इंडो-न्यूझीलंड कृषी सहकार्याला नवी दिशा
नवी मुंबई: वाशीतील एपीएमसी फळ बाजारात प्रथमच न्यूझीलंडमधील प्रीमियम रूज सफरचंदाचे गुरुवारी औपचारिक अनावरण करण्यात आले. रूज सफरचंद हा चमकदार लाल रंगाचा, कुरकुरीत व नैसर्गिक गोड चवीचा आहे.
भारतात अशा प्रकारच्या सफरचंदाचे प्रथमच आगमन झाले असून, भारत-न्यूझीलंड कृषी व्यापाराला नव्या उंचीवर नेण्याचा हा महत्त्वाचा टप्पा ठरला असून भारताच्या फळ व्यापार क्षेत्रातील एका ऐतिहासिक क्षण ठरला आहे.
न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्झन यांनी नुकत्याच झालेल्या भारत भेटीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत मुक्त व्यापार करार (FTA), गुंतवणूक संधी व द्विपक्षीय सहकार्य यावर व्यापक चर्चा केली होती, ज्यामध्ये कृषी क्षेत्राला विशेष प्राधान्य देण्यात आले. या पार्श्वभूमीवर हा लोकार्पण सोहळा झाला. लक्झन व मोदी यांनी कृषी क्षेत्राला अग्रक्रम दिल्याने आमच्यासारख्या उद्योजकांना आमचे काम राष्ट्रीय प्राधान्यांशी सुसंगत असल्याचा विश्वास मिळाला रूज सफरचंदाचे भारतातील पदार्पण हे केवळ व्यावसायिक पाऊल नाही, तर सरकार व व्यापारी पातळीवरील वाढत्या सहकार्याचे प्रतीक आहे.असे मत यावेळीरोहन सतीश उर्सल (डी बी उर्सल अँड ग्रैंडसन्स) यांनी व्यक्त केले.
व्यापारी व खरेदीदारांकडून मिळालेला प्रतिसाद उत्साहवर्धक आहे. रूज सफरचंदाच्या पहिल्या क्रेटच्या अनावरणाने व सफरचंद चवीने झाला.
अनावरण सोहळा ग्रॅहम राउस (कौन्सिल जनरल, न्यूझीलंड व ट्रेड कमिश्नर साऊथ एशिया), इरफान जाफर (डेप्युटी ट्रेड कमिश्नर, इंडिया व साऊथ एशिया), वृंदा सोनवणे (बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर, NZTE), चंद्रकांत धोले (अध्यक्ष, फळ व्यापारी संघटना), संजय पानसरे (डायरेक्टर, एपीएमसी वाशी), . राजेंद्र कोंडे (उप सचिव, एपीएमसी वाशी) तसेच अनेक वरिष्ठ व्यापारी व मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.