शिवसेना गणेशदर्शन स्पर्धेत कळव्याचे गुणसागरनगर अव्वल

ठाणे: शिवसेना ठाणे जिल्हा शाखा यांच्या विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय गणेश दर्शन स्पर्धेत कळव्यातील गुणसागरनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने साकारलेल्या ‘रान शिकवतोय’ या देखाव्याला प्रथम पारितोषिक मिळाले. विजयी स्पर्धकांना सुमारे सात लाख रुपयांच्या रोख पारितोषिकांबरोबरच उत्कृष्ट स्मृतिचिन्हे देण्यात येणार आहेत. रौप्य, सुवर्ण आणि हिरक महोत्सव इ. सातत्याने गणेशोत्सव साजरा करीत असतील अशा सर्व गणेश उत्सव मंडळांना विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

स्पर्धेत प्रथम क्रमांक गुणसागरनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, कळवा (देखावा-रान शिकवतो) एक लाख रुपये, द्वितीय क्रमांक केदारेश्वर मित्र मंडळ, आनंदनगर, (देखावा-आंतरजाल) ७५ हजार रुपये, तृतीय क्रमांक-ओमशक्ती विनायक मित्र मंडळ (देखावा-डिजीटल मनी ट्रॅप) ५० हजार रुपये, चौथा क्रमांक जयभवानी मित्र मंडळ, गोकुळनगर (देखावा-दहशतवाद), २५ हजार रुपये, पाचवा क्रमांक शिवसम्राट मित्र मंडळ, (देखावा-मंडळ आहे ना?), २१ हजार रुपये, सहावा क्रमांक एकविरा मित्र मंडळ, महागिरी १५ हजार रुपये, सातवा क्रमांक सार्वजनिक उत्सव मंडळ, जयभवानीनगर, (देखावा-संस्कृती विरूद्ध विकृती), १५ हजार रुपये, आठवा क्रमांक उत्कर्ष मंडळ, हाजुरी, (देखावा-हुंडाबळी-वैष्णवी हगवणे) १५ हजार रुपये, नववा क्रमांक गोपाळ गणेश मंडळ आझाद नगर, (देखावा-पर्यावरणहानी (स्वार्थी मनुष्यवृत्ती) १५ हजार रुपये आणि दहावा क्रमांक कोलबाड मित्र मंडळ, कोलबाड, (देखावा-अवयवदान) यांना १५ हजार रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे.

काजूवाडी वैतीनगर रहिवाशी मित्र मंडळ, श्री सिद्धिविनायक चौक, काजूवाडी, ठाणे यांना बद्रीनाथ मंदिर प्रतिकृती साकारल्याबद्दल उत्कृष्ट सजावटकार म्हणून रोख २५ हजाराचे पारितोषिक जाहीर झाले आहे. उत्कृष्ट श्री मुर्तीकार म्हणून नरेश पोहेकर यांना काजूवाडी गणेशोत्सव मंडळ आणि पराग पारधी यांना जय भवानी मित्र मंडळ, महाराष्ट्र नगरकरिता प्रत्येकी रोख दहा हजारांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले. उत्कृष्ट संहिता लेखनासाठी गणेश क्रिडा मंडळ, किसननगर ३ यांना रोख १० हजार आणि आदर्श गणेशोत्सव मंडळ म्हणून श्री गणेशोत्सव मंडळ, लोकमान्य आळी, चरई, ठाणे यांना रोख दहा हजार रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. तर शिवगर्जना मित्र मंडळ, वॉकरवाडी, उथळसर, डवलेनगर रहिवाशी सेवा संघ (गड संवर्धन), श्रीरंग सहनिवास गणेशोत्सव, बाल मित्र मंडळ (वागळेचा विघ्नहर्ता) (म- मराठी, म- महाराष्ट्र), शिवसाई मित्र मंडळ, केणीनगर, वागळे इस्टेट, ओंकारेश्वर सार्व. गणेशोत्सव मंडळ, स्वा. सावरकर नगर, स्वातंत्र्यवीर सावरकर मित्र मंडळ, सावरकर नगर आणि शिवसेना शाखा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, खेवरा सर्कल यांना प्रत्येकी रोख दहा हजाराचे विशेष पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे.

आई जिवदानी मित्र मंडळ, जोगिला मार्केट, उथळसर, जिज्ञासा मित्र मंडळ, चरई, स्नेहांकित मित्र मंडळ नौपाडा, नवयुग मित्र मंडळ, पारशीवाडी, ओम सन्मित्र मंडळ, पडवळ नगर, श्री साईबाबा मित्र मंडळ, किसन नगर २, बाल मित्र मंडळ, श्रीनगर आणि डवलेनगर सार्व. गणेशोत्सव मंडळ, लोकमान्य नगर पाडा ३ यांना रोख दहा हजार रुपयांचे गुणवत्ता पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. उत्तेजनार्थ पारितोषिकासाठी श्रीरंग सहनिवास गणेशोत्सव मंडळ, विठ्ठल क्रिडा मंडळ, चैतीनगर, साई पिंपळ मित्र मंडळ, कोपरी कॉलनी आणि सिंधुरत्न मित्र मंडळ, शांतीनगर यांची निवड करण्यात आली आहे. या मंडळांना प्रत्येकी रोख दहा हजार रुपये देण्यात येणार आहेत.

या स्पर्धेसाठी ठाणे शहरातील विविध क्षेत्रातील तज्ञांचे परिक्षक मंडळ निवडण्यात आले होते. यात प्रा.डॉ. प्रदीप ढवळ, प्रा. सुधीर चितळे, अरविंद दातार, उमेश पळणिटकर, किशोर नादावडकेर, प्रा. मंदार टिल्लु, डॉ. धनंजय पष्टे, डॉ. सिमा हर्डीकर, सुनिल जोशी, अमोल आपटे, दिपक पाटील, कल्याणी काळे, दैवता पाटील, प्रकाश कांबळी, डॉ. समिधा गोरे, डॉ. प्रतिक्षा बोर्डे, डॉ. जे.बी. भोर, ॲड. अनुराधा परदेशी यांचा समावेश होता. शिवसेना ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने विलास जोशी, ज्ञानेश्वर गायकवाड, अनिल भोर, प्रमोद बनसोडे यांनी स्पर्धेचे योग्य नियोजन केले असल्याचे खासदार नरेश म्हस्के व खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी नमूद केले.