सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही
डोंबिवली: पूर्वेकडील गोग्रासवाडी येथील अतिधोकादायक इमारत चंद्रकला म्हात्रे इमारत बुधवार 27 तारखेला सकाळी आठ वाजता पडली. सुदैवाने यात कोणतीही जीवित आणि वित्तहानी झाली नाही.
महापालिकेच्या सहायक आयुक्त हेमा मुंबरकर व अग्निशमन विभागातील अधिकारी व कर्मचारी, आपत्कालीन टीम, फेरीवाला आणि अनधिकृत पथक यांच्यामार्फत इमारत ठिकाणी जेसीबी, डम्परच्या साहाय्याने मलबा उचलण्याचे काम सुरू आहे.
घटनास्थळी कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश मोरे, शिवसेना तालुकाप्रमुख महेश पाटील, मनसे पदाधिकारी मनोज घरत, भाजपा माजी नगरसेवक निलेश म्हात्रे, शिवसेना पदाधिकारी अमोल पाटील, सहायक आयुक्त भरत पवार,पालिकेचे उपअभियंता अवधूत मदन यांनी पाहणी केली.