साडेनऊ लाखांचा ऐवज लंपास
ठाणे: रक्षाबंधनसाठी भावाच्या घरी खारघर येथे गेलेल्या लाडक्या बहिणीच्या घरी चोरट्यांनी डल्ला मारल्याचा प्रकार ठाण्यातील चरई, धोबी आळी परिसरात उघडकीस आला आहे.
ठाण्यातील चरई, धोबी आळी परिसरात राहणारे सुदेश कापडी हे शनिवारी आपल्या पत्नीला घेऊन मेव्हण्याकडे ( तिच्या भावाकडे) रक्षाबंधनसाठी गेले होते. घरात कोणीही नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी सोन्याचे दोन हार, सोन्याची चेन, दोन अंगठ्या असे 15 तोळे सोने, 50 हजारांची रोकड व देव्हाऱ्यातील दोन चांदीच्या मूर्ती असा एकूण नऊ लाख ६३ हजारांचा मुद्देमाल लंपास करून धूम ठोकली आहे. या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस चोरट्यांचा तपास करीत आहेत.