डोंबिवलीत भाजप पक्षात जोरदार इनकमिंग

कल्याण: डोंबिवली भाजपमध्ये रविवारी काँग्रेस, मनसेच्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. तसेच विविध सामाजिक संस्थेमधील आणि विविध मंडळामधील कार्यकर्ते, शेकडो नागरिकांनी प्रवेश केला. भाजप प्रदेश अध्यक्ष आणि डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली हा प्रवेश करण्यात आला.

यावेळी भाजप प्रदेश अध्यक्ष आणि डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी सांगितले की येत्या 22 जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस असून या निमित्ताने संपूर्ण राज्यात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले असून डोंबिवलीत दोन ठिकाणी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

तर डोंबिवली मंडल अध्यक्ष पवन पाटील यांनी सांगितले की महाराष्ट्राच्या विकासासाठी भाजपा परिवार कटिबद्ध असून हे विविध पक्षांतील कार्यकर्त्यांना पटवून देण्यात यश येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपा परिवारामध्ये मोठ्या प्रमाणात प्रवेश होत आहेत, याचाच एक भाग म्हणून शेकडो कार्यकर्ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली भाजप परिवारात सामील झाले आहेत असे पाटील यांनी सांगितले. यावेळी कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब, डोंबिवली मंडल अध्यक्ष पवन पाटील, मंडल अध्यक्षा प्रिया जोशी, मंडल अध्यक्ष मितेश पेणकर, समीर चिटणीस आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

कॉंग्रेस ब्लॉक अध्यक्ष शशिकांत(गणेश) चौधरी, महीला ब्लॉक अध्यक्ष गिता चौधरी, बाळा सावंत, मनसेचे सुभाष कदम, विजय शिंदे, तसेच डोंबिवली पश्चिमेमधील मनिष मोरे, राजेश भोईर, अनेक महिला मंडळं, सामाजिक मंडळं, समाजसेवक आणि सहकारी यांनी प्रवेश केला आहे.