वूमन्स प्रीमियर लीग (WPL) चा तिसरा हंगाम शुक्रवारी सुरू होणार आहे. या स्पर्धेचा पहिला सामना वडोदरा येथील कोटंबी स्टेडियमवर गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि गुजरात जायंट्स यांच्यात होणार.
आमने-सामने
गुजरात जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांनी एकमेकांविरुद्ध चार सामने खेळले असून दोन्ही संघांनी प्रत्येकी दोन जिंकले आहेत.
संघ
गुजरात जायंट्स: ॲश्ले गार्डनर (कर्णधार), बेथ मुनी (यष्टीरक्षक), दयालन हेमलथा, हरलीन देओल, लॉरा वूल्फार्ट, शबनम शकील, तनुजा कंवर, फिबी लिचफिल्ड, मेघना सिंग, काशवी गौतम, प्रिया मिश्रा, मन्नत कश्यप, सायली सातघरे, सिमरन शेख, डिआंड्रा डॉटीन, प्रकाशिका नाईक, डॅनिअल गिब्सन
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू: स्म्रीती मानधना (कर्णधार), सभिनेनी मेघना, एलिस पेरी, रिचा घोष (यष्टीरक्षक), जॉर्जिया वेरहम, श्रेयंका पाटील, रेणुका सिंग ठाकूर, एकता बिश्त, कनिका आहुजा, डॅनी वायट-हॉज, हेदर ग्रॅहम, किम गार्थ, चार्ली डीन, प्रेमा रावत, जाग्रवी पवार, जोशिथा व्ही जे, राघवी बिश्त
कुठल्या खेळाडूंवर लक्ष ठेवायचे
स्म्रीती मानधना: रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूची कर्णधार जबरदस्त फॉर्मात आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तिची अलीकडच्या काळातील अद्भुत कामगिरी ती फ्रँचायझी क्रिकेटमध्ये पुढे नेण्याचा प्रयत्न करेल. WPLमधील तिची नियमित सलामीची साथीदार सोफी डिव्हाईनच्या अनुपस्थितीत, या शैलीपूर्ण डावखुऱ्या फलंदाजावर अतिरिक्त जबाबदारी असेल.
रेणुका सिंग ठाकूर: या उजव्या हाताच्या मध्यमगती गोलंदाजाने १६ WPL सामन्यांमध्ये फक्त तीन विकेट्स घेतल्या आहेत. हे जरी धक्कादायक असले तरी तिच्या प्रतिभा आणि क्षमता यांवर कुठलेही दुमत नाही. आशा शोभना आणि सोफी मोलीन्यू या संघात नसल्यामुळे फिरकी विभाग थोडा कमकुवत दिसत आहे, म्हणूनच गोलंदाजीची धुरा या भारतीय खेळाडूला सांभाळावी लागेल.
ॲश्ले गार्डनर: गुजरात जायंट्सची नवीन कर्णधार WPLच्या या हंगामात तिच्या संघाचे प्रदर्शन सुधारवण्याचा मानस ठेवेल. गेल्या दोन आवृत्त्यांमध्ये संघ गुणतालिकेत तळाशी राहिल्याने तिच्या नेतृत्वाची कसोटी असेल. याशिवाय, एक अष्टपैलू खेळाडू असल्याने तिच्यावर दमदार वयक्तिक कामगिरी करण्याची सुद्धा अपेक्षा असेल.
बेथ मुनी: गुजरात जायंट्सची डावखुरी सलामीवीर एका यशस्वी ॲशेस दौऱ्यानंतर ही स्पर्धा खेळण्यास उतरेल. तसेच, तिने WBBL मध्ये अप्रतिम खेळ केला होता, तिने टॉप रन मिळवणाऱ्यांच्या यादीत तिसरे स्थान पटकावले होते. यष्टींच्या मागे आणि पुढे तिची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
सामन्याची थोडक्यात माहिती
तारीख: फेब्रुवारी १४, २०२५
वेळ: संध्याकाळी ७:३० वाजता
ठिकाण: कोटंबी स्टेडियम, वडोदरा
प्रक्षेपण: जिओहॉटस्टार