नवी मुंबई: सानपाडा डी मार्टजवळील सकाळच्या सुमारास दोन अज्ञात इसमांनी गोळीबार केल्याची घटना घडली आहे. सुमारे पाच ते सहा राऊंड फायर केले असल्याची माहिती मिळाली आहे.
यात राजाराम टोके यांना पोटात तीन, हाताच्या कोपऱ्यात एक, तर एक गोळी हाताला घासून गेली. या घटनेतील जखमी राजाराम टोके यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
सकाळच्या सुमारास जुईनगर रेल्वे स्टेशनजवळ, सानपाडा हद्दीतील, डी मार्टजवळ अचानक फायरिंगच्या आवाजाने गोंधळ उडाला. दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी चार ते पाच राऊंड फायर करून फरार झाले. या घटनेत राजाराम टोके यांच्या पोटात तीन, हाताच्या कोपऱ्याला एक, व एक गोळी हाताला घासून गेल्याने जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळण्यास सानपाडा पोलीस व गुन्हे शाखेने घटनास्थळी धाव घेऊन जखमी टोके यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. घटना घडलेला परिसर हा रेल्वे स्थानकाच्या जवळ असल्याने या परिसरात सकाळच्या वेळेस कामानिमित्त ये-जा करणाऱ्या नागरिकांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते. तसेच काही पावलांच्या अंतरावर डीमार्ट असल्याने हा भाग जास्त गर्दीचा मानला जातो. अशातच सकाळच्या वेळेस झालेल्या या फायरिंग मुळे परिसरात दिवशीच निर्माण झाली असून फायरिंग करणारे दोन्ही आरोपींच्या येणाऱ्या व जाणाऱ्या मार्गावरील सीसीटीव्हीच्या आधारावर पोलीस शोध घेत आहेत.
राजाराम टोके हे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत हरित कचरा उचलण्याचे काम पाहतात. मात्र मागील काही वर्षांपासून काही घटक अनधिकृतरित्या हा हरित कचरा नेत असल्याच्या तक्रारी टोके यांनी केल्या आहेत.