हैदराबाद अमली पदार्थ तस्करी
भाईंदर : हैदराबाद येथील अमली पदार्थ तस्करी प्रकरणातील आरोपीस हैदराबाद पोलिसांनी काशिमिरा पोलिसांच्या मदतीने दहिसर चेक नाका येथील बी. ओझोन या इमारतीत जाऊन पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपीने बाल्कनीतून खाली पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी अग्निशमन दल व पोलिसांच्या मदतीने आरोपीस हैदराबाद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
अमंली पदार्थ तस्करीतील मोस्ट वाँटेंड आरोपी आरोपी मोहम्मद अब्दूल मतीन (39) काशिमिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इमारतीमध्ये असल्याचे हैदराबाद पोलिसांना समजले. हैदराबाद पोलिसांनी काशिमिरा पोलिसांकडे सदर आरोपीस पकडण्यासाठी मदत मागितली. काशिमिरा पोलीस हैदराबाद पोलीसांसह दहिसर चेक नाका परिसरातील डी.बी.ओझोन या इमारतीत आले. पोलीस आल्याची माहिती मिळताच सदर आरोपीने इमारतीच्या दहाव्या मजल्यावरील बाल्कनीतून खाली उतरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तत्काळ अग्निशमन दलास पाचारण केल्याने व आरोपीचे मतपरिवर्तन करीत त्याला पुन्हा सदनिकेत जाण्यासाठी मदत केली. सदनिकेत प्रवेश करताच आरोपीने दरवाजा कडी लावून बंद केला मात्र काशिमिरा पोलिसांनी बळाचा वापर करीत दरवाजा उघडून आरोपीस ताब्यात घेऊन हैदराबाद पोलिसांच्या हवाली केले असे पोलीस निरीक्षक कालू तुरे यांनी सांगितले.
सुमारे तासभर सुरू असलेल्या या नाट्यमय घटनेची सांगता अखेर आरोपीला पकडल्यावर संपुष्टात आली. सदर आरोपीवर रेन बाजार, हैदराबाद साऊथ झोन, रेन बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.