जरी दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज हे आयसीसी महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेतील त्यांचा पहिला सामना ४ ऑक्टोबर रोजी दुबई येथे खेळणार असले तरी, हा दोन्ही संघांसाठी ‘नॉक-आऊट’ सामना ठरू शकतो. ‘ब’ गटात असलेला इंग्लंड संघ याची उपांत्य फेरीत पोहोचण्याची दाट शक्यता आहे. जर तसे झाले तर, २०२३ टी-२० विश्वचषक स्पर्धेचे उपविजेते दक्षिण आफ्रिका आणि २०१६ च्या टी-२० विश्वचषकाचे विजेते वेस्ट इंडिज यांपैकी कुठला तरी एकच संघ या स्पर्धेत पुढे जाईल. मात्र हे चित्र बदलू शकते जर काही चमत्कारिक निकाल (‘अपसेट’) लागले गेले तर.
आमने-सामने
दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांनी एकमेकांविरुद्ध २२ टी-२० सामने खेळले आहेत, ज्यापैकी दक्षिण आफ्रिकेने सात जिंकले आहेत आणि वेस्ट इंडिजने १४. टी-२० विश्वचषकात, वेस्ट इंडिजने ४-० च्या फरकाने वर्चस्व राखले आहे.
संघ
दक्षिण आफ्रिका: लॉरा वूल्फार्ट (कर्णधार), ॲनेके बॉश, तझमिन ब्रिट्स, नादिन डी क्लर्क, ॲनेरी डेर्कसन, मिके डी रिडर, आयंडा ह्लुबी, सिनालो जाफ्ता, मारिझान काप, अयाबोंगा खाका, सुने लिस, नॉनकुलुलेको मलाबा, तुमी सेखुखुने, सेशनी नायडू, क्लोई ट्रायॉन
वेस्ट इंडीज: हेली मॅथ्यूज (कर्णधार), आलिया ॲलेन, शमिलिया कोनेल, डिआंड्रा डॉटिन, शीमेन कॅम्पबेल, अश्मिनी मुनिसार, ऍफी फ्लेचर, स्टॅफनी टेलर, शिनेल हेन्री, चेडियन नेशन, कियाना जोसेफ, झैदा जेम्स, करिश्मा रामहारक, मँडी मंगरु, नेरिसा क्राफ्टन
कुठल्या खेळाडूंवर लक्ष ठेवावे
लॉरा वूल्फार्ट: दक्षिण आफ्रिकेची कर्णधार आणि उजव्या हाताची सलामीवीर हिने या कॅलेंडर वर्षात तिच्या संघासाठी आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. तिने ११ सामन्यांमध्ये १३३च्या धमाकेदार स्ट्राइक रेटने आणि ४०च्या शानदार सरासरीने ४०३ धावा नोंदवल्या आहेत.
मारिझान काप: दक्षिण आफ्रिकेच्या या धडाकेबाज अष्टपैलू खेळाडूकडून बॅटने आणि चेंडूने योगदान अपेक्षित आहे. ती उजव्या हाताची मधल्या फळीतील फलंदाज आहे आणि उजव्या हाताची मध्यमगती गोलंदाज आहे. या अनुभवी क्रिकेटपटूच्या नावावर १००+ आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांमध्ये १५०० हून अधिक धावा आणि ७५+ विकेट्स आहेत.
हेली मॅथ्यूज: वेस्ट इंडिजची कर्णधार आयसीसीच्या महिला टी-२० रँकिंग्समध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. ती उजव्या हाताची सलामीची फलंदाज आहे आणि उजव्या हाताची ऑफ स्पिन गोलंदाज आहे. तिने ९६ आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळले असून, २३००+ धावा झळकावल्या आहेत आणि १०० विकेट्स पूर्ण करण्यापासून ती फक्त एक विकेट दूर आहे.
शिनेल हेन्री: ही अष्टपैलू खेळाडू मधल्या फळीत तिच्या रोखठोक फटकेबाजीसाठी ओळखली जाते. याशिवाय, ती चेंडूसह योगदान देऊ शकते, आणि जलद गतीने गोलंदाजी करण्याची क्षमता तिच्यात आहे.
हवामान
भरपूर सूर्यप्रकाश असेल. वातावरण हवेशीर आणि उबदार राहील. तापमान ३८ अंश सेल्सिअसच्या आसपास असण्याची शक्यता आहे.
सामन्याची थोडक्यात माहिती
तारीख: ४ ऑक्टोबर २०२४
वेळ: दुपारी ३:३० वाजता
स्थळ: दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम
प्रसारण: स्टार स्पोर्ट्स नेटवर्क, डिस्नी + हॉटस्टार