आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते चावीवाटप
ठाणे : टेंभी नाका येथील जैन मंदिरासमोर विराभवन येथे पलंगे वाडीतील रहिवाशांना बुधवार १७ जुलै रोजी आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते मालकीच्या घरांच्या चावीचे वाटप करण्यात आले.
उत्तम सोयी सुविधा, आणि दर्जेदार बांधकाम असलेली हक्काची घरे मिळाल्याने रहिवाशांच्या चेहेऱ्यावर समाधान झळकत होते. श्री टेंभी नाका अचल गच्छा जैन संघ ठाणे यांचे ट्रस्टी नेमचंद विरा, जिग्नेश विरा आणि इतर यांचे आर्थिक सहाय्य, विकासक एस.के.डेव्हलपर्सचे फारुख खत्री आणि कंत्राटदार उस्मान चौहान यांच्या संयुक्त प्रयत्नातून इमारत आकारास आली. वास्तु विशारद म्हणून मकरंद तोरसकर यांनी कामगिरी बजावली. अंतर्गत आणि आर.सी.सी डिझायनिंगची जबाबदारी श्रध्दा, विलास आणि डी.के.पटेल यांनी उत्तमरीत्या पार पाडली.
या प्रकल्पास सोसायटीचे रहिवासी सुरेश पाटील, उतेकर, खानविलकर, कुलकर्णी, पष्टे, पाटील, कानडे आदींनी सहकार्य केले.