उल्हासनगर: उल्हासनगर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर आणि उपायुक्त डॉ. सुभाष जाधव यांनी प्रभाग क्रमांक १९मध्ये साफसफाई संदर्भात आढावा घेत असताना चार कर्मचारी गैरहजर असल्याचे आढळून आले. या चार कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याने आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
उल्हासनगर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर आणि उपायुक्त डॉ. सुभाष जाधव यांच्याकडे शहरातील प्रभाग क्रमांक १९(ब) सफाई कर्मचाऱ्यांच्या जागी खाजगी माणसे काम करत असल्याचे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने दोन दिवसांपूर्वी सफाई कर्मचाऱ्यांचा आढावा घेतला असता चार कर्मचारी गैरहजर असल्याचे निदर्शनास आल्याने त्या चार कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून खुलासा मागितला आहे. तसेच यापुढे प्रत्येक प्रभागातील सफाई कर्मचाऱ्यांची दररोज माहिती मागविण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.