नवी मुंबई: बेलापूर सीबीडी सेक्टर ८ येथील दुर्गामाता झोपडपट्टीत सोमवारी सकाळी ११ वाजता स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. स्वयंपाक बनवताना गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन ही आग लागल्याची माहिती समोर येत आहे.
आगीची माहिती मिळताच नवी मुंबई अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत एक ते दीड तासात आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत एकूण पाच ते सहा झोपड्या जळून खाक झाल्या असून सुरुवातीला आग विझवण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीच्या हाताला वाफ लागून तो जखमी झाला आहे. सदर झोपडपट्टी ही पूर्णपणे सिडकोच्या जागेवर वसली असून त्या झोपडपट्टीवर कारवाई करावी म्हणून सिडको अतिक्रमण विभागाला पत्र दिले आहे, अशी माहिती मनपा बेलापूर विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी शशिकांत तांडेल यांनी दिली.