३० लाखांचा गुटखा हस्तगत

ठाणे : कल्याण खडकपाडा पोलिसांच्या पथकाला मिळालेल्या माहितीवरुन गुटख्याची बेकायदेशीर वाहतूक होणार असल्यामुळे पोलिसांनी आणि अन्न सुरक्षा मानके संबंधित तब्बल 30 लाख 57 हजार 500 रु.च्या गुटख्याचा माल ताब्यात घेतला आहे.

7 मार्च 2024 रोजी दुपारी ३च्या सुमारास सहायक पोलीस निरीक्षक श्री. गायकवाड, पोलीस शिपाई व्हटकर आणि त्यांच्या पथकाने कल्याण दुर्गाडी परिसरात छापा टाकला. त्यावेळी त्या ठिकाणी आरोपी मोहम्मद राजा मोनिस पठाण (26) चालक आणि विनोद गंगवाणी मोहम्मद राजा मोनिस पठाण ( 26) रा.वापी, गुजरात यांनी आपापसांत संगनमत केले.
त्यांनी जीजे-15-अ‍ेएक्स-0348 या क्रमांकाच्या वाहनाने महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला तंबाखुजन्य पदार्थ विमल पानमसाला, व्ही-1 टोबॅको, जर्दा छोटे विमल गुटखा असा एकूण 30 लाख 57 हजार 500 रुपये किमंतीचा माल विक्रीसाठी बेकायदेशीररित्या वाहतूक करत असताना आढळले.

या प्रकाराबाबत सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून आरोपींविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोनही आरोपींना अटक करण्यात आली आहे. गुन्हयाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक श्री. गायकवाड हे करीत आहेत.