महिलादिनाच्या पूर्वसंध्येला वावीकर आय इन्स्टिट्युट आणि ठाणेवैभव यांचा संयुक्त उपक्रम
ठाणे: महिलादिनाचे औचित्य साधून वावीकर आय इन्स्टिट्युट आणि ठाणेवैभव यांच्या संयुक्त विद्यमाने विझनरी वूमन पुरस्कार देण्यात आले.
सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ. नीला परांजपे, प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगी पाटील, सुलोचना देवी सिंघानिया शाळेच्या मुख्याध्यापिका आणि संचालिका डॉ. रेवती श्रीनिवासन, वृत्त निवेदिका ज्ञानदा कदम, ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीजच्या अध्यक्षा सुजाता सोपारकर, ठाणे महापालकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे, पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनच्या मुख्य समन्वयक जान्हवी खांडेकर, उद्योजिका जयश्री रामाणे आणि गोल्फ खेळाडू आणि प्रशिक्षक मिता गोवंडे यांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
डॉ.चंद्रशेखर आणि डॉ. वैशाली वावीकर, ‘ठाणेवैभव’चे संपादक मिलिंद बल्लाळ आणि सरस्वती विद्यालय शाळेच्या अध्यक्षा मीरा कोरडे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळेस एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर उपस्थित होते. ‘ठाणेवैभव’चे व्यवस्थापकिय संपादक निखील बल्लाळ यांनी आभार प्रदर्शन केले तर साधना जोशी यांनी सूत्रसंचालन केले.