नवी मुंबई: भाडे नाकारणाऱ्या रिक्षा चालकांच्या विरोधात परिवहन विभागाने कारवाईचे संकेत देऊनही रिक्षा चालकांकडून भाडे नाकारण्याचे प्रकार सुरू आहेत. अशा प्रकारे भाडे नाकारणाऱ्या आठ रिक्षा चालकांवर वाशी वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे.
जवळचे भाडे नाकारणे, प्रवाशांसोबत हुज्जत घालणे असे प्रकार रिक्षा चालकांकडून नित्याचेच झाले आहेत. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागते. असाच प्रकार वाशीत घडला आहे. येथील वाशी सेक्टर १७ मध्ये भाडे नाकारले म्हणून सोशल मीडियावर एका नागरिकाने तक्रार केली होती. याची वाशी वाहतूक पोलिसांनी तत्काळ दखल घेत अशा रिक्षा चालकांवर कारवाईचा बडगा उगारला. अशा आठ रिक्षा चालकांवर कारवाई केली आहे, अशी माहिती वाशी वाहतूक शाखेचे t पोलीस निरीक्षक दिलीप गुजर यांनी दिली आहे.