विमेन्स प्रीमियर लीग (WPL) चा दुसरा सीन 23 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. हरमनप्रीत कौरच्या मुंबई इंडियन्सचा सामना बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर मेग लॅनिंगच्या दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे. हे दोन संघ पहिल्या आवृत्तीचा अंतिम सामना खेळले होते जो मुंबई इंडियन्सने जिंकला
संघ
मुंबई इंडियन्स: अमनजोत कौर, अमेलिया कर, क्लोइ ट्रायॉन, हरमनप्रीत कौर (कर्णधार), हेली मॅथ्यूज, हुमैरा काझी, इसाबेल वोंग, जिंतिमनी कलिता, नताली सिव्हर-ब्रंट, पूजा वस्त्राकर, प्रियांका बाला, सायका इशाक, यास्तिका भाटिया, शब्निम इस्माईल, सजीवन सजना, अमनदीप कौर, फातिमा जाफर, कीर्थना बालकृष्णन
दिल्ली कॅपिटल्स: मेग लॅनिंग (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, ॲलिस कॅप्सी, अरुंदती रेड्डी, जेस जोनासेन, लॉरा हॅरिस, मारिझान कॅप, मिन्नू मणी, पूनम यादव, राधा यादव, शफाली वर्मा, शिखा पांडे, स्नेहा दीप्ती, तानिया भाटिया, तितास साधू, ॲनाबेल सदरलँड, अपर्णा मोंडल, अश्विनी कुमारी
WPL मध्ये आमने सामने
मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांनी एकमेकांविरुद्ध तीन सामने खेळले असून, मुंबईने 2-1 अशा फरकाने आघाडीवर आहे.
कुठल्या खेळाडूंवर लक्ष ठेवायचे
हेली मॅथ्यूज: एखाद्या स्पर्धेत सलामीच्या फलंदाजाने सर्वाधिक विकेट्स पटकावणे फारच दुर्मिळ असते. WPL 2023 मध्ये, या वेस्ट इंडिजच्या अष्टपैलू खेळाडूने केवळ बॅटनेच नाही तर चेंडूनेही असाधारण प्रदर्शन केले. ऑफ स्पिन गोलंदाजी करत तिने 16 विकेट्स घेतल्या आणि स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांपैकी एक होती. बॅटने तिने 271 धावा केल्या आणि ती पाचवी सर्वोत्तम ठरली. मॅथ्यूजमध्ये मुंबई इंडियन्सकडे एक अप्रतिम बहुआयामी खेळाडू आहे.
नताली सिव्हर-ब्रंट: मुंबई इंडियन्सच्या संघातील आणखी एक अभूतपूर्व अष्टपैलू खेळाडू म्हणजे इंग्लंडची नताली सिव्हर-ब्रंट. WPL 2023 मध्ये 332 धावांसह ती दुसरी आघाडीची धावा करणारी खेळाडू होती. ही उजव्या हाताची फलंदाज या आवृत्तीत सुद्धा पुन्हा एकदा संघाच्या फलंदाजीचा कणा बनेल. तिच्या फलंदाजीव्यतिरिक्त WPL 2023 मध्ये तिने तिच्या संघासाठी उपयुक्त षटके टाकली आणि 10 विकेट्स घेतल्या होत्या.
मेग लॅनिंग: माजी ऑस्ट्रेलियन कर्णधाराने गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून जवळपास याच वेळी निवृत्ती घेतली, परंतु तिच्यात अजूनही बरच क्रिकेट शिल्लक आहे. ही 31 वर्षीय खेळाडू व्हिक्टोरियासाठी देशांतर्गत क्रिकेट खेळतेआणि WBBL मध्ये देखील भाग घेते. WPL 2023 मध्ये, दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऑरेंज कॅप विजेता होता जिने 345 धावा केल्या, जे स्पर्धेतील सर्वोच्च होते.
शफाली वर्मा: भारताची उजव्या हाताची सलामीची फलंदाजी दिल्ली कॅपिटल्ससाठीही फलंदाजीची सुरुवात करेल. ती महिला क्रिकेटमधील सर्वात निडर फलंदाजांपैकी एक आहे आणि तिचा कर्णधार लॅनिंगसोबत चांगली जोडी बनवते. ही जोडी आग आणि बर्फासारखी आहे, वर्मा जितकी आक्रमक आहे तेवढी लॅनिंग संयमी आहे. WPL 2023 मध्ये, वर्माने 185 च्या स्ट्राइक रेटने (स्पर्धेतील सर्वोत्तम स्ट्राईक रेट) 252 धावा केल्या आहेत.
खेळपट्टी
ऐतिहासिकदृष्ट्या, येथे फलंदाजीसाठी अनुकूल अशी खेळपट्टी असते. इतर भारतीय मैदानांपैकी हे लहान असल्या कारणाने येथे चौकार आणि षटकार मारणे सोपे आहे. म्हणून भरपूर धावांची अपेक्षा करा. अशा परिस्थीनमुळे येथे गोलंदाजी करणे तितके सोपे नाही. तथापि, गोलंदाजांसाठी भिन्नता वापरणे उपयोगाचे ठरू शकते.
हवामान
सायंकाळी तापमान 23 अंश सेल्सिअसच्या आसपास राहिल्याने हवामान आल्हाददायक राहण्याचा अंदाज आहे. ढगांचे आवरण राहणार नाही आणि पावसाची शक्यता नाही. आर्द्रता सुमारे 28% असेल.
सामन्याची थोडक्यात माहिती
तारीख: 23 फेब्रुवारी 2024
वेळ: संध्याकाळी 7:30 वाजता
स्थळ: एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू
प्रसारण: जिओ सिनेमा, स्पोर्ट्स 18