कल्याणतील गुप्ता कुटुंबातील चिमुकल्यांनी कबतुराला दिले जीवनदान

कल्याण : कल्याणमध्ये गुप्ता कुटुंबीयांनी पतंगाच्या मांज्यात अडकलेल्या कबुतराचा जीव वाचवला.  माणसातला पक्षीदया ही आज देखील  शिल्लक असल्याचे यानिमित्ताने दिसले आहे.
कल्याणमध्ये राहणाऱ्या गुप्ता कुटुंबातील चिमुकले १० वर्षांचा आरव गुप्ता आणि त्याची चुलत बहीण सुहानी गुप्ता (१५) वर्षे हे दोघे कल्याणच्या रामबाग येथील सागर अपार्टमेंटच्या गच्चीवर खेळत असताना त्यांना पतंगाच्या मांज्यात एक कबुतर जखडून अडकलेले दिसले आणि कबुतर त्यातून बाहेर पडण्यासाठी तळमळ करीत होते. या मुलांनी या कबुतराचा जीव वाचवण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर लगेचच त्यांचे काका पारसनाथ गुप्ता (54) वर्षे यांना ही माहिती दिली, पारसनाथ यानी तातडीने या मुलांसोबत कात्री घेऊन इमारतीच्या टेरेसवर जाऊन मांज्यामध्ये अडकलेल्या मांज्या कापून कबुतराची सुटका केली.
यानंतर त्यांनी त्याला नैसर्गिक अधिवासात सोडवण्यासाठी गेले असता तो उडू शकत नसल्याचे आढळून आले. अशा परिस्थितीत मुलांनी आपल्या कुटुंबीयांच्या मदतीने वनविभागाशी संपर्क साधून हे कबुतर प्राणीमित्र योगेश कांबळे यांच्या पथकाकडे सुपूर्द केले. योगेश कांबळे यांच्या टीमने सांगितले की, कबुतर सुरक्षित असून ते घाबरलेले असल्याने काही वेळाने ते सुरक्षितपणे उड्डाण करील त्यानुसार काही काळानंतर कबुतर सुखरूप आपल्या जगात उडत असल्याचे पाहून गुप्ता कुटुंबातील मुलांच्या चेहऱ्यावर एक अनोखा आनंद दिसत होता. इमारतीतील सर्व लोक त्यांच्या या मानवतावादी उपक्रमाचे कौतुक करीत होते.