कल्याणमध्ये आदित्य ठाकरे यांचे सरकारवर टिकास्त्र
कल्याण : कोल्डकॉफी देणारे खासदार इथून निवडणूक लढाणार नाहीत असं ऐकलं असून त्यांच्यात हिम्मत असेल तर कल्याण मधून लढून दाखवा जिंकून दाखवा असे आवाहन माजी मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना करत विद्यमान सरकारवर खरमरीत टिका केली.
आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी कल्याण लोकसभा क्षेत्रातील कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी शिवसेना शाखेला भेट देत शिवसैनिकांशी संवाद साधला. शिवसेना कोळसेवाडी मध्यवर्ती शाखेच्या वतीने ढोल ताशांच्या गजरात भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी खासदार राजन विचारे, वरुण सरदेसाई, माजी महापौर रमेश जाधव, शिवसेना उपजिल्हा प्रमुख हर्षवर्धन पालांडे, शरद पाटील, विजया पोटे आदी पदाधिकाऱ्यांसाह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आदित्य ठाकरे यांनी येथे लढायला तयार आहात की नाही हे विचारायला आलो असून भाजपाने चिंदी चोरांचे सरकार बसवलं आहे. गुन्हेगारांमध्ये सरकारची भीती असायला हवी पण गद्दारांचे सरकार असल्याने गुंडाराज पसरले आहे. भाजपा आमदारांनी पोलीस स्टेशनमध्ये गोळी घातली. दोन्ही बाजुंनी चाललेली गुंडागर्दी सूरु असून ते सरकार उलथवणार की नाही असा सवाल उपस्थितांना विचारला. मिंदे सरकार बदनाम झालं आहेच पण यामुळे आपला महाराष्ट्र बदनाम होत आहे. गुंड लोकं भेट घेत आहेत रिल्स बनवत आहेत.
घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांचे होर्डिंग महापालिका बघत नाही, त्यांच्य बॅनरवर कारवाई करत नाही. ठाण्यापासून येताना प्रत्येक बॅनरवर त्यांच्या पोज बघायला मिळत आहेत यामध्ये भीती बघायला मिळत असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मिमिक्री केली. आम्हाला कायद्याचा धाक धकवतात. गेल्या 2 वर्षात महाराष्ट्रातील उद्योजकांना घाबरवल जातं त्यांना गुजरातला पळवले जात आहे. छोटे उद्योजकांकडे खंडणी मागितली जात आहे. ठाण्यात महिलेला लाथा मारल्या त्यावर कारवाई झाली नाही. कोल्हापूरला देखील घरात जाऊन महिलेला मुलीला मारतात.
गद्दार जेव्हा आम्हाला शिव्या देतात तेव्हा बरं वाटतं. माहीमला गणपती मिरवणुकीत त्यांच्या आमदाराने बंदूक रोखली त्यांच्यावर कारवाई नाही त्यांना सिद्धिविनायक मंदिर न्यासाच अध्यक्ष बनवलं आहे. पुण्यात गुंडाची परेड काढली हे गुंड जेलमध्ये पाहिजेत पण हे गुंड मंत्रालयात जाऊन रिल्स बनवतात. या गुंडांची धिंड काढायची झाली तर पहिले कोण उभं असेल असा सवाल आदित्य यांनी केला.
दोन वर्षांच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुरळीत सुरू होतं. मात्र यांनी सर्व उद्योग गुजरातला पळवले. उल्हासनगर मधील पोलीस स्टेशनमधलं सिसिटीव्ही फुटेज बाहेर आलं मात्र माहीम मधलं फुटेज बाहेर आलं नाही. कल्याण लोकसभेत भाजपाची गळचेपी होतेय की नाही हा सवाल भाजपाच्या मंत्री, आमदार आणि कार्यकर्त्यांना आहे. मुख्यमंत्र्यांमध्ये धमक असेल तर गुंडांना शूट ऍट साईटच्या ऑर्डर द्या, बाळासाहेबांनी गुंडगिरी साफ केली होती. जे पक्ष महिलेवर अत्याचार करतात अशांना फासावर द्यायचं सोडून त्यांना हार घालता अशी टीका करत महाराष्ट्र हिताचे लोकप्रतिनिधी निवडून दिले पाहिजे
निवडणूक जेव्हा जाहीर होईल तेव्हा चिन्ह मशाल आणि विजय विशाल असेल. 2024 ची निवडणूक करा किंवा मरा अशी झाली आहे. लोकशाही टिकेल की नाही ते सांगता येत नाही अशी चिंता देखील आदित्य ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली.