भारताने अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली असून प्रत्येक सामन्यात त्यांनी सहा विकेट्स राखून पराभव केला आहे. या दोन्ही सामन्यांमध्ये भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तिसऱ्या टी-२० मध्ये गमावण्यासारखे काहीही नसल्यामुळे, शर्माने नाणेफेक जिंकल्यास प्रथम फलंदाजी करण्याचा विचार करू शकतो. तसेच १६ सदस्यीय संघातील १३ खेळाडू या दोन सामन्यात खेळले आहेत. संघ व्यवस्थापनाकडे या टी-२० मध्ये (जो आयसीसी टी-२० क्रिकेट विश्वचषकापूर्वीचा शेवटचा आंतरराष्ट्रीय टी-२० आहे), संजू सॅमसन, आवेश खान आणि कुलदीप यादव या तीन खेळाडूंना संधी देण्याचा पर्याय आहे.
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तिसरा टी-२० सामना १७ जानेवारी रोजी बेंगळुरूच्या एम. छिन्नस्वामी स्टेडियमवर खेळवला जाईल.
टी-२० क्रिकेटमध्ये आमने सामने
भारत आणि अफगाणिस्तान एकमेकांविरुद्ध सात टी-२० सामने खेळले आहेत, ज्यापैकी भारताने सहा जिंकले आहेत आणि एका सामन्याचा निकाल लागला नाही. भारतात, त्यांनी दोन सामने खेळले आहेत (जे सध्या सुरू असलेल्या द्विपक्षीय मालिकेचा भाग आहेत) आणि भारताने त्या दोन्हीमध्ये विजय मिळवला आहे.
भारत | अफगाणिस्तान | |
आयसीसी टी-२० रँकिंग्स | १ | १० |
टी-२० क्रिकेटमध्ये आमने सामने | ६ | ० |
भारतात | २ | ० |
संघ
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, टिळक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, आवेश खान, मुकेश कुमार.
अफगाणिस्तान: इब्राहिम झदरन (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), इक्रम अलीखिल (यष्टीरक्षक), हजरतुल्ला झाझाई, रहमत शाह, नजीबुल्ला झदरन, मोहम्मद नबी, करीम जनात, अजमातुल्ला उमरझाई, शराफुद्दीन अश्रफ, मुजीब उर रहमान, फजलहक फारुकी, फरीद अहमद, नवीन उल हक, नूर अहमद, मोहम्मद सलीम, कैस अहमद, गुलबदिन नायब, रशीद खान.
कुठल्या खेळाडूंवर लक्ष ठेवायची गरज
यशस्वी जैस्वाल: भारताच्या या डावखुऱ्या सलामीच्या फलंदाजाने अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० मध्ये सर्वाधिक धावा केल्या. पहिल्या टी-२० सामन्यात त्याला संघात जागा मिळाली नव्हती. परंतु दुसऱ्या सामन्यात संधी मिळताच त्याने त्याचे सोने केले. मुंबईच्या या फलंदाजाने ३४ चेंडूत पाच चौकार आणि सहा षटकारांसह शानदार ६८ धावा केल्या.
अक्षर पटेल: भारताच्या या डावखुऱ्या फिरकी गोलंदाजाने अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात सामनावीराचा पुरस्कार जिंकला. त्याने पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात एक विकेट पटकावली. त्याने त्याच्या चार षटकांच्या स्पेलमध्ये १७ धावा देऊन एकूण दोन गडी बाद केले. शिस्तबद्ध गोलंदाजी सातत्याने केल्यामुळे तो त्याच्या संघासाठी सर्वात यशस्वी आणि किफायतशीर गोलंदाज होता.
गुलबदिन नइब: अफगाणिस्तानच्या या अष्टपैलू खेळाडूने भारताविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात ३५ चेंडूत ५७ धावा ठोकून टी-२० क्रिकेटमध्ये त्याची सर्वोत्तम धावसंख्या नोंदवली. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या या उजव्या हाताच्या फलंदाजाने आपल्या मनोरंजक खेळीत पाच चौकार आणि चार षटकार ठोकले. त्याच्या फलंदाजीव्यतिरिक्त, तो मध्यमगती गोलंदाजी करू शकतो.
करीम जनत: अफगाणिस्तानचा हा उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज भारताविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात त्याच्या संघासाठी सर्वोत्तम गोलंदाज होता. त्याने दोन षटकात १३ धावा देऊन दोन गडी बाद केले. त्या दोन्ही विकेट्स त्याने १३ व्या षटकात पटकावल्या. ६.५ धावा प्रति षटक या दराने गोलंदाजी करत, या उच्च धावसंख्येच्या सामन्यात, तो त्याच्या संघासाठी सर्वात किफायतशीर गोलंदाज होता. त्याच्याकडून मधल्या आणि अंतिम षटकांमध्ये चांगली गोलंदाजी करणे अपेक्षित आहे.
खेळपट्टी
या ठिकाणी आजपर्यंत पुरुषांच्या आठ टी-२० सामने आयोजित केले गेले आहेत, ज्यापैकी दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघांनी पाच जिंकले आहेत. येथे नोंदवलेली धावसंख्या २०२ आहे आणि सर्वात कमी १२२ आहे. भारतामधील सर्वात लहान क्रिकेट मैदानांपैकी एक असेलेल्या या मैदानावर भरपूर धावा होण्याची अपेक्षा आहे. तथापि, ढगाळ परिस्थिती वेगवान गोलंदाजांना, विशेषत: नवीन चेंडूसह मदत करू शकते.
हवामान
१९ अंश सेल्सिअस तापमानासह हवामान अंशतः ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. ९४% ढगांचे आच्छादन असेल आणि पावसाची शक्यता नाही. दक्षिण-पूर्वेकडून वारे वाहतील.
माइलस्टोन अलर्ट
- नजीबुल्ला झद्रान त्याचा १०० वा आंतरराष्ट्रीय टी-२० सामना खेळणार आहे
- अक्षर पटेलला आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये ५० विकेट्स पूर्ण करण्यासाठी १ विकेटची गरज आहे
- मोहम्मद नबीला आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये २००० धावा पूर्ण करण्यासाठी ६७ धावांची गरज आहे
सामन्याची थोडक्यात माहिती
तारीख: १७ जानेवारी २०२४
वेळ: संध्याकाळी ७ वाजता
स्थळ: एम. छिन्नस्वामी स्टेडियम, बेंगळुरू
प्रसारण: जिओ सिनेमा, स्पोर्ट्स १८