ठाणे: चारपैकी तीन राज्यांत भाजपाला बहुमत मिळाले असून जनतेने सुशासन आणि विश्वासाला पसंती दिल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी प्रतिक्रिया आमदार संजय केळकर यांनी दिली आहे.
चार राज्यांचे निकाल रविवारी जाहीर झाले असून यात मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपने बहुमत मिळवले आहे. या विजयाचा आनंद देशभरात व्यक्त होत आहे. ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांनीही याबाबत त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या विजयाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महानायक आहेत. या विजयामुळे विश्वास, सुशासन, सुरक्षा, सुविधा, संवेदना आणि विकासावर शिक्कामोर्तब झाले आहे. मोदी हे तो सब मुमकिन हैं असे श्री.केळकर यांनी सांगितले. सध्या विरोधक जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करून त्याचा राजकीय फायदा उचलत आहेत. मात्र जाती धर्मामध्ये फुट पाडणाऱ्यांना मतदारांनी दिलेली ही चपराक आहे, असेही श्री.केळकर यांनी स्पष्ट केले.