अफगाणिस्तानकडून सात गडी राखून झालेल्या पराभवाच्या निराशेतून श्रीलंका सावरत असताना भारताने त्यांना ५५ धावांत गुंडाळले आणि ३०२ धावांच्या मोठ्या फरकाने पराभूत केले. या दोन पराभवांच्या जखमा श्रीलंकेच्या मनात ताज्या असतील. तथापि, बांगलादेशविरुद्धच्या त्यांच्या पुढील सामन्यात ते अधिक मजबूत होतात की कमी आत्मविश्वासाने मैदानात उतरतात, हे पाहणे उत्सुकतेचे असेल. गमावण्यासारखे काहीही नसलेल्या बांगलादेशने क्रिकेटचा निर्भय ब्रँड खेळणे आणि श्रीलंकेच्या जखमेवर मीठ चोळणे अपेक्षित आहे.
आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ च्या ३८ व्या सामन्यात, बांगलादेश आणि श्रीलंका, ६ नोव्हेंबर रोजी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर एकमेकांशी भिडतील. दिल्लीची हवेची गुणवत्ता खराब आहे आणि बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील सामना रद्द केला जाऊ शकतो असे वृत्त आहे.
बांगलादेश आणि श्रीलंका एक दिवसीय क्रिकेटमध्ये आमने सामने
बांगलादेश आणि श्रीलंका १९८६ पासून एकमेकांविरुद्ध ५३ एकदिवसीय सामने खेळले आहेत, त्यापैकी बांगलादेशने नऊ जिंकले आहेत, श्रीलंकेने ४२ जिंकले आहेत आणि दोन सामन्यांचा निकाल लागला नाही. भारतात, त्यांनी एकमेकांविरुद्ध दोन एकदिवसीय सामने खेळले आहेत आणि श्रीलंकेने दोन्ही जिंकले आहेत. विश्वचषकात ते तीन वेळा आमनेसामने आले आहेत आणि सर्व प्रसंगी श्रीलंकेने विजय मिळवला आहे.
बांगलादेश | श्रीलंका | |
आयसीसी रँकिंग (एक दिवसीय क्रिकेट) | ८ | ७ |
एक दिवसीय क्रिकेटमध्ये आमने सामने | ९ | ४२ |
भारतात | ० | २ |
विश्वचषकात | ० | ३ |
आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ मधील बांगलादेश आणि श्रीलंकेची आतापर्यंतची कामगिरी
बांगलादेश आणि श्रीलंका आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ मध्ये आपला आठवा सामना खेळतील. सात सामन्यांपैकी, बांगलादेशने फक्त एक जिंकला आहे आणि ते स्पर्धेतून बाहेर पडले आहेत, तर श्रीलंकेने दोन जिंकले आहेत आणि त्यांना उपांत्य फेरीसाठी पात्र ठरण्याची संधी जरी असली तरी ती खुपच बिकट आहे. दोन्ही संघांनी लक्ष्याचा पाठलाग करताना आपले सामने जिंकले आहेत.
सामना क्रमांक | बांगलादेश | श्रीलंका |
१ | अफगाणिस्तानचा ६ गडी राखून पराभव | दक्षिण आफ्रिकेकडून १०२ धावांनी पराभव |
२ | इंग्लंडकडून १३७ धावांनी पराभव | पाकिस्तानकडून ६ विकेटने पराभव |
३ | न्यूझीलंडकडून ८ विकेटने पराभव | ऑस्ट्रेलियाकडून ५ विकेटने पराभव |
४ | भारताकडून ७ विकेटने पराभव | नेदरलँड्सचा ५ विकेटने पराभव |
५ | दक्षिण आफ्रिकेकडून १४९ धावांनी पराभव | इंग्लंडचा ८ विकेटने पराभव |
६ | नेदरलँड्सकडून ८७ धावांनी पराभव | अफगाणिस्तानकडून ७ विकेटने पराभव |
७ | पाकिस्तानकडून ७ विकेटने पराभव | भारताकडून १०० धावांनी पराभव |
संघ
बांगलादेशः शाकिब अल हसन (कर्णधार), लिटन दास, तन्झिद हसन तमीम, नजमुल हुसेन शांतो, तौहिद हृदोय, मुशफिकुर रहीम, महमुदुल्लाह रियाद, मेहिदी हसन मिराझ, नसुम अहमद, शाक मेहेदी हसन, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान, हसन महमूद, शोरीफुल इस्लाम, तनझिम हसन साकिब.
श्रीलंका: कुसल मेंडिस (कर्णधार), कुसल परेरा, पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, सदीरा समरविक्रमा, चारिथ असालंका, धनंजया डी सिल्वा, महीष थीकशाना, दुनिथ वेललागे, कसून राजिथा, अँजेलो मॅथ्यूज, दिलशान मदुशंका, दुशान हेमंथा, चमिका करुणारत्ने, दुष्मंथा चमीरा

दुखापती अपडेट्स
बांगलादेश आणि श्रीलंकेला दुखापतीची चिंता नाही.
खेळण्याची परिस्थिती
दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील सामना होणार आहे. हा दिवस-रात्र सामना असेल. या स्पर्धेतील पाचवा आणि शेवटचा सामना हे ठिकाण आयोजित करेल. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनी चारपैकी तीन सामने जिंकले आहेत. येथे सर्वाधिक धावसंख्या ४२८ आणि सर्वात कमी ९० आहे. दिवसाच्या बहुतांश भागांमध्ये फलंदाजीसाठी परिस्थिती चांगली असेल. मात्र, जर वापरलेल्या खेळपट्टीवर हा सामना खेळला गेला तर फिरकी गोलंदाजांना मदत मिळेल.
हवामान
हवामान धुके राहण्याची शक्यता आहे. दिवसभरात कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील. ढगांचे आवरण राहणार नाही आणि पावसाची शक्यता नाही. उत्तर-वायव्येकडून वारे वाहतील.
कुठल्या खेळाडूंवर लक्ष ठेवायचे
महमुदुल्लाह: बांगलादेशचा उजव्या हाताचा मधल्या फळीतील फलंदाज हा त्याच्या संघासाठी पाच डावांत ६९ च्या सरासरीने आणि ८९ च्या स्ट्राइक रेटसह २७४ धावा करून आघाडीवर आहे. याशिवाय, तो फिरकी गोलंदाजी करून काही उपयुक्त षटके टाकू शकतो.
मेहदी हसन मिराझ: बांगलादेशचा हा अष्टपैलू चेंडूने प्रभावी ठरला आहे. त्याने सात सामन्यांत नऊ विकेट्स घेतल्या आहेत. फलंदाजीमध्ये त्याने एका अर्धशतकासह १६९ धावांचे योगदान दिले आहे.
सदीरा समरविक्रमा: हा श्रीलंकेचा उजव्या हाताचा मधल्या फळीतील फलंदाज ३०० + धावा करणारा त्याच्या संघातील एकमेव फलंदाज आहे. त्याने सात सामन्यांमध्ये ६६ च्या सरासरीने आणि १०३ च्या स्ट्राईक रेटने ३३१ धावा ठोकल्या आहेत.
दिलशान मधुशंका: या विश्वचषकात श्रीलंकेच्या गोलंदाजीचा अविभाज्य भाग म्हणजे हा डावखुरा वेगवान गोलंदाज. त्याने सात सामन्यांत १८ विकेट्स घेतल्या आहेत ज्यात एक फायफर आणि एक फोरफरचा समावेश आहे.
आकड्यांचा खेळ
- शाकिब अल हसनला एकदिवसीय क्रिकेटमध्ये ७५०० धावा पूर्ण करण्यासाठी १२ धावांची गरज
- लिटन दासला एकदिवसीय क्रिकेटमध्ये २५०० धावा पूर्ण करण्यासाठी २५ धावांची गरज
- नजमुल हुसेन शांतोला एकदिवसीय क्रिकेटमध्ये १००० धावा पूर्ण करण्यासाठी ५ धावांची आवश्यकता
- महीष थीकशानाला एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५० विकेट्स पूर्ण करण्यासाठी ३ विकेट्सची आवश्यकता
- अँजेलो मॅथ्यूजला एकदिवसीय क्रिकेटमध्ये ६००० धावा पूर्ण करण्यासाठी १०० धावांची गरज
- कुसल मेंडिसला एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३५०० धावा पूर्ण करण्यासाठी १६ धावांची गरज
- चारिथ असलंकाला एकदिवसीय क्रिकेटमध्ये १५०० धावा पूर्ण करण्यासाठी ५६ धावांची गरज
- सदीरा समरविक्रमाला एकदिवसीय क्रिकेटमध्ये १००० धावा पूर्ण करण्यासाठी ५४ धावांची गरज
सामन्याची थोडक्यात माहिती
तारीख: ६ नोव्हेंबर २०२३
वेळ: दुपारी २: ०० वाजता
स्थळ: अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली
प्रसारण: स्टार स्पोर्ट्स, हॉटस्टार
(सर्व आकडेवारी ईएसपीएन क्रिकइन्फो वरून घेतली आहे)