पाकिस्तान बांगलादेशला हरवून उपांत्य फेरीची आशा जिवंत ठेवू शकेल?

पाकिस्तानने त्यांचे पहिले दोन सामने जिंकून त्यांच्या विश्वचषक मोहिमेची सकारात्मक सुरुवात जरी केली असली, तरी पुढच्या चार सामन्यांमध्ये कसा विजय मिळवायचा हे ते विसरले. ते तिन्ही विभागांमध्ये सामान्य दिसून आले आणि त्यांच्या कर्णधाराच्या नेतृत्वावर देखील प्रश्न उपस्थित केले गेले. बांगलादेशचीसुद्धा विश्वचषक मोहीम विस्मरणीय राहिली आहे, कारण ते एक संघ म्हणून कामगिरी करण्यात अपयशी ठरले.

३१ ऑक्टोबर रोजी, आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ चा सामना क्रमांक ३१ बांगलादेश आणि पाकिस्तान   यांच्यामध्ये कोलकता येथील ईडन गार्डन्सवर होणार आहे.

 

बांगलादेश आणि पाकिस्तान एक दिवसीय क्रिकेटमध्ये आमने सामने

बांगलादेश आणि पाकिस्तान १९८६ पासून एकमेकांविरुद्ध ३८ एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये पाकिस्तानने ३३ जिंकले आहेत आणि बांगलादेशने पाच जिंकले आहेत. भारतात त्यांनी कधीही एकमेकांविरुद्ध एकदिवसीय सामना खेळला नाही. विश्वचषकात, त्यांची दोनदा भेट झाली, आणि दोन्ही संघांनी एक-एक सामना जिंकला.

  पाकिस्तान बांगलादेश
आयसीसी रँकिंग (एक दिवसीय क्रिकेट)
एक दिवसीय क्रिकेटमध्ये आमने सामने ३३
एक दिवसीय क्रिकेटमध्ये (विश्वचषकात)

 

आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ मधील बांगलादेश आणि पाकिस्तानची आतापर्यंतची कामगिरी

बांगलादेश आणि पाकिस्तान आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ मध्ये आपला सातवा सामना खेळतील. पाकिस्तानने पहिले दोन सामने जिंकले आहेत आणि नंतरचे सलग चार सामने गमावले आहेत, तर बांगलादेशने त्यांचा पहिला सामना जिंकला आणि त्यांच्या पुढील पाच सामन्यांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

सामना क्रमांक पाकिस्तान बांगलादेश
नेदरलँड्सचा ८१ धावांनी पराभव अफगाणिस्तानचा ६ गडी राखून पराभव
श्रीलंकेचा ६ विकेटने पराभव इंग्लंडकडून १३७ धावांनी पराभव
भारताकडून ७ विकेटने पराभव न्यूझीलंडकडून ८ विकेटने पराभव
ऑस्ट्रेलियाकडून ६२ धावांनी पराभव भारताकडून ७ विकेटने पराभव
अफगाणिस्तानकडून ८ विकेटने पराभव दक्षिण आफ्रिकेकडून १४९ धावांनी पराभव
दक्षिण आफ्रिकेकडून १ विकेटने पराभव नेदरलँड्सकडून ८७ धावांनी पराभव

 

संघ

बांगलादेशः शाकिब अल हसन (कर्णधार), लिटन दास, तन्झिद हसन तमीम, नजमुल हुसेन शांतो, तौहिद हृदोय, मुशफिकुर रहीम, महमुदुल्लाह रियाद, मेहिदी हसन मिराझ, नसुम अहमद, शाक मेहेदी हसन, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान, हसन महमूद, शोरीफुल इस्लाम, तनझिम हसन साकिब.

पाकिस्तान: बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, फखर जमान, इमाम-उल-हक, अब्दुल्ला शफीक, मोहम्मद रिझवान, सौद शकील, इफ्तिखार अहमद, सलमान अली आगा, मोहम्मद नवाज, उसामा मीर, हरिस रौफ, हसन अली, शाहीन आफ्रिदी, मोहम्मद वसीम.

 

दुखापती अपडेट्स

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानच्या शादाब खानला दुखापत (कनकशन) झाली होती. त्याची जागा उसामा मीरने घेतली. तसेच, पाकिस्तानसाठी, उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज हसन अली तापामुळे दक्षिण आफ्रिकेचा सामना खेळू शकला नाही. बांगलादेश सामन्यासाठी तो तंदुरुस्त घोषित करण्यात आला आहे. आता शादाब शिवाय पाकिस्तान आणि बांगलादेशसाठी दुखापतींची चिंता नाही.

 

खेळण्याची परिस्थिती

कोलकत्याच्या ईडन गार्डन्सवर बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यातील सामना होणार आहे. हा दिवस-रात्र सामना असेल. या स्पर्धेतील दुसरा सामना हे ठिकाण आयोजित करेल. प्रथम फलंदाजी करणार्‍या संघाने येथे खेळलेला मागील सामना २२९ धावांचा यशस्वी बचाव करून जिंकला. क्रिकेटच्या रोमांचक खेळासाठी परिस्थिती अनुकूल असेल. फलंदाजांना आणि गोलंदाजांना खेळपट्टीतून काहीतरी मदत मिळेल.

 

हवामान

हवामान धुके राहण्याची शक्यता आहे. दिवसभरात कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील. ढगांचे आच्छादन नसेल आणि पावसाची १% शक्यता आहे. उत्तरेकडून वारे वाहतील.

 

कुठल्या खेळाडूंवर लक्ष ठेवायचे

महमुदुल्ला: पाच सामन्यांमध्ये ७३ च्या सरासरीने आणि ९२ च्या स्ट्राइक रेटने २१८ धावा करून बांगलादेशचा हा उजव्या हातचा मधल्या फळीतील फलंदाज प्रभावशाली ठरला आहे

शरीफुल इस्लाम: बांगलादेशचा डावखुरा वेगवान गोलंदाज सहा सामन्यांत आठ बळी घेत प्रभावी ठरला आहे. नव्या चेंडूने तो चांगली गोलंदाजी करत आहे.

मोहम्मद रिझवान: पाकिस्तानचा उजव्या हाताचा मधल्या फळीतील फलंदाज आणि यष्टीरक्षक याने सहा सामन्यांत ६७ च्या सरासरीने आणि ९७ च्या स्ट्राईक रेटने ३३३ धावा केल्या आहेत.

शाहीन आफ्रिदी: एकदिवसीय क्रिकेटमध्ये १०० विकेट्स पूर्ण करण्यापासून एक विकेट दूर असलेल्या पाकिस्तानच्या या डाव्या हाताच्या वेगवान सनसनाटीने सहा सामन्यांमध्ये १३ बळी घेतले आहेत, ज्यात एक चार विकेट हॉलचा समावेश आहे.

 

आकड्यांचा खेळ

  • हसन अली आणि शाहीन आफ्रिदी यांना एकदिवसीय क्रिकेटमध्ये १०० विकेट्स पूर्ण करण्यासाठी १ विकेटची आवश्यकता
  • मुस्तफिजुर रहमान त्याचा १०० वा एकदिवसीय सामना खेळणार आहे
  • मेहदी हसन मिराझला एकदिवसीय क्रिकेटमध्ये १०० विकेट्स पूर्ण करण्यासाठी ३ विकेट्सची गरज
  • लिटन दासला एकदिवसीय क्रिकेटमध्ये २५०० धावा पूर्ण करण्यासाठी ७० धावांची गरज
  • नजमुल हुसेन शांतोला एकदिवसीय क्रिकेटमध्ये १००० धावा पूर्ण करण्यासाठी ९ धावांची गरज

 

सामन्याची थोडक्यात माहिती

तारीख:  ३१ ऑक्टोबर २०२३

वेळ: दुपारी २:०० वाजता

स्थळ: ईडन गार्डन्स, कोलकता

प्रसारण: स्टार स्पोर्ट्स, हॉटस्टार

 

 

(सर्व आकडेवारी ईएसपीएन क्रिकइन्फो वरून घेतली आहे)