आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ चा १४ वा सामना ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात १६ ऑक्टोबर रोजी लखनौ येथील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल.
ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका एक दिवसीय क्रिकेटमध्ये आमने सामने
ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांनी १९७५ ते २०२२ दरम्यान एकमेकांविरुद्ध १०२ एकदिवसीय सामने खेळले आहेत, त्यापैकी ऑस्ट्रेलियाने ६३ जिंकले आहेत, श्रीलंकेने ३५ जिंकले आहेत आणि चार सामन्यांचा निकाल लागला नाही. भारतात, त्यांनी एकमेकांविरुद्ध फक्त एक एकदिवसीय सामना खेळला आहे, तो सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला आहे. विश्वचषक स्पर्धेत, ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेने आठ विजय मिळवून वर्चस्व गाजवले आणि त्यांच्याविरुद्ध फक्त एक सामना गमावला.
ऑस्ट्रेलिया | श्रीलंका | |
आयसीसी रँकिंग (एक दिवसीय क्रिकेट) | ४ | ७ |
एक दिवसीय क्रिकेटमध्ये आमने सामने (विजय) | ६३ | ३५ |
भारतात एक दिवसीय क्रिकेटमध्ये आमने सामने | १ | ० |
विश्वचषकात (विजय) | ८ | १ |
आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ मधील ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेची आतापर्यंतची कामगिरी
ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ चा आपला तिसरा सामना खेळणार आहेत. दोन्ही संघांनी त्यांचे पहिले दोन सामने गमावल्यामुळे त्यांच्या विश्वचषक मोहिमेची सुरुवात खराब झाली आहे. ऑस्ट्रेलियाचा चेन्नईमध्ये भारताकडून सहा विकेट्सनी पराभव झाला आणि मग त्यांना लखनौमध्ये दक्षिण आफ्रिकेकडून १३४ धावांनी पराभव पत्करावा लागला, तर श्रीलंकेला दक्षिण आफ्रिकेकडून दिल्लीत १०२ धावांनी आणि हैदराबादमध्ये पाकिस्तान विरुद्ध सहा विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका: संघ, दुखापती अपडेट्स, खेळण्याची परिस्थिती, हवामान आणि कुठल्या खेळाडूंवर लक्ष ठेवायची गरज आहे
संघ
ऑस्ट्रेलिया: पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, अॅलेक्स कॅरी, जोश इंग्लिस, शॉन अॅबॉट, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, मार्नस लाबूशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा, मिचेल स्टार्क.
श्रीलंका: दासुन शनाका (कर्णधार)*, कुसल मेंडिस, कुसल परेरा, पाथुम निसांका, लाहिरू कुमारा, दिमुथ करुणारत्ने, सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, महीष थीकशाना, दुनिथ वेललागे, कसुन रजीथा, मथीशा पथीराना, दिलशान मधुशंका, दुषण हेमंता.
दुखापती अपडेट्स
श्रीलंकेचा कर्णधार दासून शनाका मंगळवारी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात उजव्या मांडीच्या स्नायूला दुखापत झाल्याने विश्वचषकातून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी चमिका करुणारतने आला आहे. या विश्वचषकात या पुढे उपकर्णधार कुसल मेंडिस संघाचे नेतृत्व करेल अशी अपेक्षा आहे*. ऑस्ट्रेलियाचा, ट्रॅव्हिस हेड, ज्याचा हात फ्रॅक्चर झाला आहे तो अजून पर्यंत विश्वचषकासाठी भारतात आलेला नाही.
खेळण्याची परिस्थिती
लखनौ येथील भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यातील सामना होणार आहे. हा दिवस-रात्र सामना असेल. २०२३ च्या विश्वचषकादरम्यान ऑस्ट्रेलियाने येथे एक एक दिवसीय सामना खेळला आहे, ज्यात त्यांचा दक्षिण आफ्रिकेकडून १३४ धावांनी पराभव झाला. दुसरीकडे श्रीलंका येथे आपला पहिला एक दिवसीय सामना खेळणार आहे. या स्पर्धेचा दुसरा सामना या ठिकाणी होणार आहे. फिरकी गोलंदाजांना थोडीफार मदत आणि फलंदाजीसाठी चांगल्या परिस्थितीची अपेक्षा आहे.
हवामान
हवामान धुके राहण्याची शक्यता आहे. दिवसभरात कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील. ढगांचे आच्छादन ७२% असेल. २५% पावसाची आणि ६% वादळाची शक्यता आहे. वारा पूर्वेकडून वाहेल.
कुठल्या खेळाडूंवर लक्ष ठेवायचे
ऑस्ट्रेलियासाठी या विश्वचषकात आतापर्यंत काहीही बरोबर झाले नाही. फलंदाजी, गोलंदाजी, आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागात त्यांचे प्रदर्शन निराशाजनक राहिलेले आहे. मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूड हे वेगवान त्रिकूट जे धोक्याचे ठरू शकते ते अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकले नाही. त्यातल्यात्यात हेझलवूडने मागील दोन सामन्यांत चार विकेट्स घेऊन प्रभावित केले आहे. त्याचप्रमाणे फलंदाजीही फारशी चांगली झाली नाही. डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ यांना फलंदाजीची मोठी जबाबदारी उचलावी लागणार आहे. वॉर्नर आणि स्मिथ यांनी त्यांच्या विश्वचषक मोहिमेची सुरुवात बरी केली आहे, परंतु अद्याप त्यांच्या नावावर मोठी धावसंख्या नाही.
श्रीलंकेसाठी कुसल मेंडिसचं फलंदाजीत योगदान लक्षणीय असेल. तो आतापर्यंतच्या विश्वचषकात त्याच्या संघासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याने दोन सामन्यांमध्ये ९९ च्या सरासरीने आणि १६६ च्या स्ट्राईक रेटने १९८ धावा केल्या आहेत. श्रीलंकेची फलंदाजी मेंडिसभोवती फिरू शकते. गोलंदाजांमध्ये डावखुरा मध्यमगती गोलंदाज दिलशान मधुशंका महत्त्वाचा असेल. गेल्या दोन सामन्यांत त्याने चार विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्याकडून नवीन चेंडूने चांगली गोलंदाजी करणे आणि संघाला लवकर यश मिळवून देणे अपेक्षित आहे.

सामन्याची थोडक्यात माहिती
तारीख: १६ ऑक्टोबर २०२३
वेळ: दुपारी २:०० वाजता
स्थळ: भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियम, लखनौ
प्रसारण: स्टार स्पोर्ट्स, हॉटस्टार
(सर्व आकडेवारी ईएसपीएन क्रिकइन्फो वरून घेतली आहे)