Thanevaibhav Online
14 September 2023
कसारा: येथील वीर तानाजी नगरात भाड्याने राहत असलेल्या युवक-युवतीने एकाच वेळी गळफास घेऊन जिवन संपवल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.
सोमनाथ सोनावणे (23) आणि सुजाता देशमुख (21) अशी या आत्महत्या केलेल्यांची नावे असल्याचे कसारा पोलिस उपनिरीक्षक सागर जाधव यांनी सांगितले. मंगळवारी पहाटे ही दुर्दैवी घटना घडली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
हे जोडपे स्थानिक नसून केवळ दोन महिन्यांपासूनच तानाजी नगरमध्ये भाड्याने राहत होते. आत्महत्येपूर्वी त्यांनी सुसाईड नोट वगैरे लिहून ठेवलेली नसल्याने त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्टच आहे. या घटनेचा पुढील तपास कसारा पोलिस निरीक्षक रमेश तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सागर जाधव हे करीत आहेत.