‘लागू बंधू’चा रत्नांचे माहेर नेत्रदीपक सोहळा 

डोंबिवली : गेल्या ८६ वर्षांपासून ग्राहकसेवेत असलेले, संपूर्ण जगभरात दागिन्यांच्या क्षेत्रात मानाचे स्थान असलेल्या लागू बंधू तर्फे “रत्नांचे माहेर” हे एक्सक्लुझिव्ह रत्नजडित दागिन्यांचे प्रदर्शन कल्याण-डोंबिवलीकरांसाठी आयोजित केले आहे.

आठ दशकांपासून चालत आलेला समृद्ध वारसा लागू बंधूंची आजची पिढीही सक्षमपणे चालवत आहे. वैविध्यपूर्ण डिझाइन्स आणि उत्कृष्ट गुणवत्ता या प्रमुख वैशिष्ट्यांमुळे जनमानसात लागू बंधू ह्यांच्याबद्दल कमालीची विश्वासार्हता आहे. लागू बंधू म्हणजे अस्सल नवरत्नांचे माहेरघर. त्यांची नवरत्ने ही अगदी मान्यताप्राप्त प्रयोगशाळा प्रमाणपत्रासह देखील उपलब्ध आहेत. लागू बंधू त्यांच्या ग्राहकांच्या आवश्यकतेनुसार, आवडीनुसार खास कस्टम-मेड ज्वेलरी बनवतात. अप्रतिम दर्जाचे आणि सुंदर असे “रत्नांचे माहेर” हे एक्सक्लुझिव्ह रत्नजडित दागिन्यांचे प्रदर्शन लागू बंधू घेऊन येत आहेत. १ ते ३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ८.३० पर्यंत ओम श्रीराम बिल्डिंग, जुना आग्रा रोड, कल्याण (प.) येथे तर ९ व १० सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ८.३० पर्यंत पलावा सिटी, कासाबेला गोल्ड क्लब हाउस, डोंबिवली (पू). येथे हे प्रदर्शन आयोजित केले आहे.